बहीण-भावाच्या नात्याला फासला काळिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:22 IST2019-11-13T00:22:38+5:302019-11-13T00:22:40+5:30

सावत्र बहिणीलाच आई बनविणाऱ्या भावाविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Sister-brother-in-law hanging over his head | बहीण-भावाच्या नात्याला फासला काळिमा

बहीण-भावाच्या नात्याला फासला काळिमा

उल्हासनगर : सावत्र बहिणीलाच आई बनविणाऱ्या भावाविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशेळे गावात अल्पवयीन मुलगी आई, वडील व सावत्र भावासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी आई व वडील भिवंडी येथे मोलमजुरीचे काम करण्यासाठी गेल्यावर अल्पवयीन मुलगी सावत्र भावासोबत राहत होती. २६ वर्षांच्या भावाचे लग्न झाले असून त्याची पत्नी काही कारणास्तव माहेरी गेली. या दरम्यान अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान मुलीची आई घरी आल्यानंतर लहान बाळ घरात दिसले. याबाबत विचारणा केल्यावर, सावत्र भावाने मुलगी मुंबईला सापडल्याचे सांगितले. तसेच बाळाचा सांभाळ करण्याचे सांगून त्याच्या संगोपनासाठी जळगाव येथे आजी-आजोबा यांच्याकडे पाठविले असे सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील एका गावात लहान मुलांची चर्चा होऊन गावाच्या पोलीस पाटील यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर खरा प्रकार उघड होऊन सावत्र भावाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील चौकशीसाठी गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करून पोलिसांनी सावत्र भावाला अटक केली.
>न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिच्या मुलीवर जळगाव येथे उपचार सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे.

Web Title: Sister-brother-in-law hanging over his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.