शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

एकाच माेहिमेत गिर्यारोहकांनी सर केले सह्याद्रीमधील १२ सुळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 1:16 AM

गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेची रेंज सुळके क्लायम्बिंग मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गिरीमित्र प्रतिष्ठान, ॲडव्हेंचर इंडिया आणि जिद्दी माउंटनिरिंग या संस्थांनी खोडकोना–मेढवन रेंजमधील नऊ सुळके, अडसूळ, भावाचा ढूक (अजिंक्य) आणि महालक्ष्मी असे पालघर जिल्ह्यातील एकूण १२ सुळके १४ ते १८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान यशस्वीरीत्या सर केले. या सर्व सुळक्यांची उंची साधारण ४०-१५० फूट होती. ही संस्थेची १७ वी मोहीम होती. 

या मोहिमेत मंगेश कोयंडे, अरविंद नवेले आणि अमोल अळवेकर सहभागी झाले होते. १४ फेब्रुवारी २०२१ ला टीम डोंबिवलीमधून बाइकने प्रवास करून दुपारी खोडकोना गावात पोहाेचली. १५ फेब्रुवारीला नवेले यांनी लीड करून केएम १ आणि केएम ४ असे सुळके सर केले, तर अळवेकर यांनी लीड करून केएम २, ३, ५ असे सुळके सर केले. 

मागोमाग इतर सदस्य सुळक्यांवर पोहाेचले. १६ फेब्रुवारीला नवेले यांनी लीड करून केएम ६, ७, ९ सुळके तर अळवेकर यांनी लीड करून केएम ८ असे सुळके सर केले. १७ फेब्रुवारी रोजी कोयंडे यांनी लीड करून अडसूळ सुळका, तर नवेले यांनी लीड करून भावाचा ढूक हा अजिंक्य सुळका सर केला. सोबत बाकी सदस्यदेखील होते. १८ फेब्रुवारी रोजी नवेले यांनी पुन्हा लीड करून महालक्ष्मी सुळका सर केला आणि सोबत इतर सदस्यदेखील होते. 

या मोहिमेत सिक्वेन्स क्लाइंबिंग पद्धतीचा वापर करून गाइडमन, मिडलमन आणि एण्डमन अशी आरोहणाची तांत्रिक पद्धत वापरली. मोहिमेमध्ये माउंटेनिरिंग रोप, कॅराबिनर, डिसेंडर, क्विकड्रॉ, पिटोन, टेपस्लिंग, डायनिमा, हॅमर, हार्नेस, हेल्मेट, पीए शूज अशा साधनांचा वापर केला. ओव्हरहँग, चिमणी क्लाइंबिंग, क्रॅक क्लाइंबिंग, चेन बोल्टिंग अशा वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून क्लाइंबिंग पूर्ण केले.

सर्व सुळक्यांच्या माथ्यावर टीमने राष्ट्रीय ध्वज आणि स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकवला. शिवरायांच्या नावाची ललकारी दिली आणि जयघोषही केला होता. संस्थेची ही सुळके क्लाइम्बिंग मोहीम आमचे गुरू दिवंगत अरुण सावंत आणि दिवंगत राजू मोरे यांना समर्पित करत आहोत, असे कोयंडे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे