‘हात दाखवा, बस थांबवा’ सुविधा

By Admin | Updated: August 25, 2015 02:39 IST2015-08-25T02:39:11+5:302015-08-25T02:39:11+5:30

कुटुंब पास योजनेचा प्रस्ताव विचाराधीन असतानाच आता केडीएमटीची हात दाखवा बस थांबवा, ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. परिवहनच्या सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला

'Show your hand, stop the bus' feature | ‘हात दाखवा, बस थांबवा’ सुविधा

‘हात दाखवा, बस थांबवा’ सुविधा

डोंबिवली : कुटुंब पास योजनेचा प्रस्ताव विचाराधीन असतानाच आता केडीएमटीची हात दाखवा बस थांबवा, ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. परिवहनच्या सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सभापती नितीन पाटील यांनी दिली. सोमवारी हा निर्णय झाल्याचे ते म्हणाले.
सध्या आठ मार्गांवर ही सुविधा देण्यात येणार असून त्यात कल्याणमधील ४ व डोंबिवलीतील ४ मार्गांचा समावेश असेल. प्रवाशांच्या मागणीनुसार ही सुविधा देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: 'Show your hand, stop the bus' feature