बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:09 AM2019-03-19T04:09:37+5:302019-03-19T04:10:01+5:30

पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.

Shouting against the biogas project, resident of Rajunagar in Dombivli | बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

बायोगॅस प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी, डोंबिवलीतील राजूनगरमधील रहिवासी आक्रमक

Next

डोंबिवली  - पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रविवारी परिसरातील महिला, पुरुष यांनी एकत्र येत प्रकल्पाच्या ठिकाणी त्याविरोधात घोषणाबाजी व निदर्शने केली. उद्यानासाठी भूखंड आरक्षित होता, मग ती जागा बायोगॅससाठी कशी दिली, असा सवाल करत तो अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

गणेशनगरपुढील राजूनगर येथे बायोगॅस प्रकल्प उभारला जात आहे. त्यात कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील पांडुरंग टॉवर, राजवैभव कॉम्प्लेक्स, अमर आॅर्चिड, द्वारका सोसायटी, ओम गणपती सोसायटी, हापसीबाबा सोसायटी, आनंद प्रभा सोसायटी, साईपद्म सोसायटी, श्रीसाई दीप सोसायटी, राजवैभव एनएक्स आदी सोसायट्यांतील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

महापालिकेने रहिवाशांच्या विरोधाकडे गांभीर्याने बघावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी बायोगॅस प्रकल्पविरोधी कृती समितीचे सदस्य विनोद सोनावणे यांनी दिला. ते म्हणाले की, स्थानिक नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे या नागरिकांसोबत आहेत. त्या अनेक इमारतींच्या मधोमध हा प्रकल्प आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच कचऱ्याची दुर्गंधी पसरून डास, उंदीर, घुशी, झुरळ, मुंग्या यांचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळेही नागरिकांना विशेषत: लहान मुलांना याचा त्रास होऊ शकतो. याच ठिकाणाहून काही अंतरावर महापालिकेचे दोन जलकुंभ आहेत. त्यालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणीही रहिवाशांनी केली. बायोगॅसमुळे निर्माण होणाºया गॅसच्या साठ्याचा कधी स्फोट झाला, तर नागरिकांच्या जीवाचे काय? महापालिका या बाबी गांभीर्याने का घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, निदर्शनाच्या वेळी व्यंकटेश गायकवाड, जितू देशमुख, आत्माराम मोरे, सुहास देशमुख, भूषण पांडे, मनीष शिंदे, सचिन गायकवाड, प्रफुल्ल गिरी आदी उपस्थित होते.

प्रकल्प खाडीकिनारी हलवणे योग्य

महापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, हा प्रकल्प राजूनगरमध्ये होऊ नये. तेथे उद्यान व्हावे. बायोगॅसचा प्रकल्प खाडीकिनारी अन्यत्र स्थलांतरित करता येऊ शकतो.
त्यामुळे त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा. आम्ही मात्र नागरिकांसमवेतच आहोत, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले.

बायोगॅस प्रकल्पापासून नागरिकांना कोणताही अपाय नाही. बीएआरसीच्या निसर्ग रूमअंतर्गत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पश्चिमेत दररोज ८० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी या प्रकल्पात केवळ १० मेट्रिक टन कचºयापासून बायोगॅस बनवला जाणार आहे. आयरे गावातील प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तो नागरिकांनी आवर्जून बघावा.
- घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता,
घनकचरा निर्मूलन विभाग, केडीएमसी


 

Web Title: Shouting against the biogas project, resident of Rajunagar in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.