शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारतभर जनता कर्फ्यूमुळे दुकानं बंद; स्वामी फाऊंडेशनकडून फळे, पाणी, बिस्किटची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 17:01 IST

तसेच एखाद्याला गरजू व्यक्ती आढळल्यास त्यांचीही जेवणाची सोय केली जाईल, असे आवाहन महेश कदम यांनी केले आहे.

आज भारतभर जनता कर्फ्यू असल्याने खाण्यापिण्यापासून सर्वच दुकाने बंद आहेत. पोलीस, डॉक्टर, नर्स,  फिल्डवर काम करणारे पत्रकार यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आज स्वामी फाऊंडेशनने फळे, पाणी, बिस्किटची सोय केली आहे. गर्दी टाळण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते तीन तीनच्या गटाने फळांच्या पिशव्या संस्थेच्या कार्यालयात तयार करीत आहेत. स्वामी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी ही सोय केली आहे. तसेच एखाद्याला गरजू व्यक्ती आढळल्यास त्यांचीही जेवणाची सोय केली जाईल, असे आवाहन महेश कदम यांनी केले आहे. स्वामी फाऊंडेशनच्या कार्यालयात  8767711117 , 9029666567 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.कोरोनावर मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करीत आहे. डॉक्टर, नर्सेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटत आहात. पोलीसही रस्त्यावर दिवस रात्र राबत आहेत. अचूक बातमी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारही काम करीत आहेत. यात त्यांचे खण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे या उद्देशाने मी ही सोय केली आहे. काही ठिकाणी असे आढळून आले की, काही गोर गरीब आपल्या गावावरून काही कामानिमित्त आले. त्यांना कर्फ्युची माहिती नव्हती आज जायला निघाले परंतु गाडी नसल्याने ते रस्त्याच्या कडेला बसून आहेत, खायला काही मिळते का पाहायला गेले तर दुकाने बंद आहेत. स्वामी फाऊंडेशनचे कदम यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांना फळे नेऊन दिली आहेत. तसेच अशा जेवणाची सोय ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने आदल्या दिवशीच 250 किलो फळे, 200 किलो संत्री, 300 किलो कलिंगड, 300 बिस्कीट पुडे, 100 डझन केली, 50 बॉक्स पाणीच्या बाटली आणून ठेवल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस