शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 00:06 IST

तौक्ते चक्र ीवादळाच्या तडाख्यामुळे ठाण्यात चालत्या मोटार कारवर झाड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तातडीने धाव घेत ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकांनी या कारमधील डॉ. रितेश गायकवाड (४५, रा. ठाणे) यांची सुखरुप सुटका केली.

ठळक मुद्दे ठाणे अग्निशमन दलाची कामगिरीनौपाडयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तौक्ते चक्र ीवादळाच्या तडाख्यामुळे ठाण्यात चालत्या मोटार कारवर झाड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तातडीने धाव घेत ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकांनी या कारमधील डॉ. रितेश गायकवाड (४५, रा. ठाणे) यांची सुखरुप सुटका केली.नौपाडा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाजवळील रस्त्यावरुन गोडबोले रुग्णालयाकडे जात असलेल्या चालत्या मोटारकारवर हे झाड अचानक कोसळले. ही घटना इतकी इचानक घडली की, मोटारीतील डॉ. रितेश यांना बाहेरही पडता आले नाही. यात ते चांगलेच अडकले. ही माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाच्या एका इंजिनसह जवानांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील कक्षाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने याठिकाणी बचावकार्य केले. या मोटारकारमध्ये अडकलेल्या डॉ. रितेश यांची अर्ध्या तासांच्या अंतराने सुखरुप सुटका करण्यात आली. या अपघातामध्ये जखमी झाल्यामुळे त्यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, नौपाडा पोलिसांनी ही कोंडी दूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र