शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

धक्कादायक! ५० लाखांच्या खंडणीसाठी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर शेअर दलालाचे अपहरण: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 01:05 IST

शेअर बाजारात गुंतवणूक केलेली रक्कम वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर नवी मुंबईतील एका ४० वर्षीय शेअर दलालाचे अपहरण केले. नंतर त्याला ठार मारण्याची धमकी देत ५० लाखांची मागणी करुन त्याच्याकडे पाच लाख रुपये उकळणाऱ्या रोहीत कांबळे आणि किशोर आढाव या सराईत गुंडांना पाठलाग करुन कोपरी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देपाठलाग करुन पोलिसांनी घेतले ताब्यातकोपरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शेअर बाजारात गुंतवणूक केलेली रक्कम वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर नवी मुंबईतील एका ४० वर्षीय शेअर दलालाचे अपहरण केले. नंतर त्याला ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडे ५० लाखांची मागणी करुन पाच लाख रुपये उकळणाºया रोहीत कांबळे आणि किशोर आढाव या सराईत गुंडांना पाठलाग करुन अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी बुधवारी दिली. यातील अन्य दोघांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या या शेअर दलालाचे ठाण्याच्या कोपरीमध्ये कार्यालय आहे. त्यांनी नेमलेल्या दलालांमार्फतीने अनेक गुंतवणूकदारानी शेअर्स बाजारात गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकदारांमध्ये प्रथमेश मोहिते यांनी सप्टेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत एकुण 92 लाखांची गुंतवणूक केली होती. त्यांनाही त्याचा परतावा देण्यात आला होता. मात्र, मार्च माहिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे शेअर बाजार कोसळला. यात गुतवणूकदारांचा दरमहा मिळणारा परतावा बंद झाला. यातूनच मोहितेसह काही जणांनी शेअर दलालाला मे महिन्यामध्ये सानपाडा येथे बोलविले. शेअर बाजारातील मंदी उठल्यानंतर सर्वांचा परतावा देतो, असेही या दलालाने त्यांना सांगितले. यातील प्रथमेशने ताबडतोब पैसे देण्याची धमकी दिली. तेंव्हा ४० लाख रुपये टप्याटप्याने तर उर्वरित रक्कम पाच ते सहा महिन्यांनी देतो, असे या दलालाने सांगितले. मात्र, 23 आॅक्टोबर रोजी किशोर आढाव याच्यासह चौघांनी दलालाचे ठाण्यातील कार्यालयात त्याला गाठले. आम्हाला प्रथमेश मोहिते यांनी पाठविल्याचे सांगत या दलालाच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखून तू त्यांचे घेतलेले पैसे दे, ‘ हमारे इजाजत के बिगर तु कैसा धंदा करता है,’ ‘अभी हमको 50 लाख रु पये दे नही तो जानसे मार दुंगा’ अशी धमकी देऊन रिव्हॉल्वरची मूठ त्याच्या खांद्यावर मारून त्याला एका वाहनातून त्याच्या घरी घेऊन नेले. घरातून पाच लाख रु पये घेऊन नंतर महिन्याला दोन लाख रुपये देण्याच्या अटीवर सोडले.याप्रकरणी २४ आॅक्टोबर रोजी त्याने कोपरी पोलीस ठाण्यात तक्र र दाखल केली. पोलिसांनी २५ आॅक्टोबर रोजी या दलालाच्या कार्यालयाजवळ सापळा रचून हप्त्याची रक्कम घेण्यासाठी आलेल्या रोहीत आणि त्याचा साथीदार किशोर याला पाठलाग करुन अटक केली. त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी