शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह सात पोलिसांना कोरोनाची लागण

By जितेंद्र कालेकर | Updated: April 14, 2020 19:45 IST

एकीेकडे विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलीस सरसावलेले असतांनाच मुंब्रा येथील आणखी एका अधिका-यासह तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सातवर पोहचली आहे.

ठळक मुद्देमुंब्रा येथील आणखी एका अधिका-यासह तीन पोलीस पॉझिटिव्हपोलिसांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंब्रा येथील आणखी एका अधिकाºयासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच पोलीस ठाण्यात चौघे तर आयुक्तालयात सात जणांचा कोरोना बाधीतांमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे पोलिसांचीही चिंता वाढली आहे.मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि पालिका अधिकारी कर्मचारी यांची माहिती घेण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कातील एका अधिकाºयासह चौघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान त्यांची कोरोनाची तपासणीही करण्यात आली. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षातून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधीच मुंब्रा येथील एक निरीक्षक तर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यापाठोपाठ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोघा पोलीस कर्मचाºयांचीही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ठाण्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या सातवर पोहचली आहे. यातील केवळ एक अधिकारी वगळता इतर सहा जणांवर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस