ठाणे: येथील महागिरी कोळीवाडा भागातील केके रोड परिसरात शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तीन मोटारसायकलींना आगी लावण्यात आल्याची घटना घडली. आतापर्यंत अशा प्रकारच्या सर्व आगीच्या घटनांमधील आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. महागिरी कोळीवाडयातील या घटनेचा ठाणेनगर पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.केके रोड परिसरात शुक्र वारी पहाटे अब्बास कुंभार यांच्या दोन तर मोहम्मद कुंभार यांच्या एका अशा तीन मोटारसायकली या आगीमध्ये जळाल्या आहेत. यातील एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. त्या दुचाकीच्या शेजारी उभ्या असलेल्या इतर दोन दुचाकी अर्धवट जळालेल्या होत्या. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकी जळाल्या की जाळण्यात आल्या याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवघ्या अडिच महिन्यातील ठाणे शहरातील दुचाकी जाळण्याचा हा सातवा प्रकार असल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
धक्कादायक! ठाण्यात वाहनांना आगी लावण्याचे सत्र सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:24 IST
ठाणे शहरात वाहनांना आगी लावण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. शुक्रवारी पहाटेही महागिरी कोळीवाडा भागातील तीन दुचाकींना आगी लावण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! ठाण्यात वाहनांना आगी लावण्याचे सत्र सुरुच
ठळक मुद्देतीन मोटारसायकलींना लावल्या आगीठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हाशुक्रवारी पहाटेची घटना