धक्कादायक! पगाराची विचारणा केल्याने सुरक्षा अधिकाऱ्याने केली रक्षकाला लोखंडी सळईने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 09:23 PM2020-01-05T21:23:38+5:302020-01-05T21:28:27+5:30

केवळ पगाराची विचारणा केल्याने आपल्या कनिष्ठ सहका-याला खासगी सुरक्षा रक्षक कंपनीच्या अधिका-याने लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना वर्तकनगर येथील दोस्ती विहार येथे नुकतीच घडली. या सुरक्षा अधिकाºयाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

Shocking! Security officer beats a guard with an iron rod after asking for his salary | धक्कादायक! पगाराची विचारणा केल्याने सुरक्षा अधिकाऱ्याने केली रक्षकाला लोखंडी सळईने मारहाण

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे ठाण्याच्या दोस्ती विहार येथील घटनावर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पगाराची विचारणा केल्याने खासगी सुरक्षारक्षक पुरविणा-या कंपनीचा अधिकारी सरोज रॉय (४२) याने जितेंद्र सिंग (४२) या सुरक्षारक्षकाला लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी राय याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी येथील रहिवासी सुरक्षारक्षक जितेंद्र सिंग हे हर्स सिक्युरिटी या खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांची वर्तकनगर, ‘दोस्ती विहार’ येथील वरुणा बिल्डिंगच्या कार पार्किंगमध्ये ३१ डिसेंबर २०१९ रोजी रात्रीची ड्युटी होती. त्यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हर्स सिक्युरिटीचे क्षेत्रीय अधिकारी रॉय यांनी या कार पार्किंगच्या ठिकाणी तपासणीसाठी भेट दिली. तेव्हा मला पैशांची गरज असून माझा पगार कधी होणार, अशी विचारणा सिंग यांनी रॉय यांच्याकडे केली. ही विचारणा केल्याचा राग आल्याने रॉय यांनी त्यांना वरुणा बिल्डिंगच्या शिडीवर बोलावून घेतले. तिथे त्यांनी शिवीगाळ करीत सिंग यांना लोखंडी सळईने उजव्या हाताच्या कोपरावर जोरदार फटका मारून त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, ते तिथून निघून गेले. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी सुरक्षारक्षक कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस हवालदार एस.ए. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Shocking! Security officer beats a guard with an iron rod after asking for his salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.