शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

धक्कादायक! मोटारकार शोरूमच्या विक्री प्रतिनिधीची सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 00:50 IST

ठाण्यातील ह्युंदाई मोटारकार शोरूमचे विक्री प्रतिनिधी सचिन राणे (४०) यांनी याच शोरूमच्या सातव्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्दे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील ह्युंदाई मोटारकार शोरूमचे विक्री प्रतिनिधी सचिन राणे (४०) यांनी याच शोरूमच्या सातव्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.तीन वर्षांपूर्वीच राणे हे ह्युंदाई मोटारकार शोरूममध्ये विक्री प्रतिनिधी म्हणून रुजू झाले होते. त्यांचे कामही चांगले होते. गेल्या एक महिन्यापासून मात्र ते अस्वस्थ वाटत होते, असे त्यांचे सहकारी सांगत होते. मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गालगत असलेल्या मुंबई बाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यालगत ह्यमोदी हाऊसह्ण ही सात मजली इमारत आहे. याच इमारतीचा तळ अधिक एक मजल्यावर मोटारकारचे शोरूम आणि विक्री कार्यालय आहे. या कार्यालयात ते कार्यरत होते. सायंकाळी ४.३० वोण्याच्या सुमारास या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी राणे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे आढळले. तातडीने नौपाडा पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राणे यांचे कौटुंबिक वाद होते, की कार्यालयीन काही वाद होते, अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सचिन यांच्या मागे पत्नी आणि पाचवर्षीय मुलगा असा परिवार आहे. 

सचिन राणे यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याची चौकशी नौपाडा पोलीस करीत आहेत. आम्हालाही याबाबत अधिक माहिती नाही.गौतम वर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, ह्युंदाई शोरूम, ठाणे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी