लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबईच्या साकीनाका येथील कोरोना संशयित पोलिसाच्या मदतीने ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथील वाहन चालकांकडून खंडणी उकळणा-या अमोल देवळेकर (४४, रा. भिवंडी, ठाणे) या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून एका कारसह बनावट ओळखपत्र, पोलीस अधिकाºयाची टोपी, पाच हजारांची रोकड आणि एक मद्याच्या बाटल्यांचा बॉक्स असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.खारेगाव टोलनाक्यावर एक टोळी मुंबई पोलिसाच्या मदतीने वाहन चालकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्याचे आदेश कळवा पोलिसांना दिले होते. त्यानुसार कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने ५ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून तोतया पोलीस अमोल रात्री १० वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई देखील त्याच्याबरोबर सक्रीय होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.* पोलीस असल्याची बतावणी करीत पैसे उकळायचेअमोल आणि कोरोना संशयित असलेला मुंबई वाहतूक शाखेचा पोलीस हे भिवंडीच्या मानकोलीतून मद्य घेऊन जाणाऱ्यांना हेरायचे. ठाणे आणि भिवंडीत जाणारी काही मद्याची वाहनेही ते अडवित असत. त्यांच्याकडून पाच ते दहा हजारांपर्यंत खंडणी गोळा करुन प्रकरण मिटवत होते. ४ जुलै रोजी देखिल राजू पार्टे (रा. पाचपाखाडी, ठाणे) यांची खारेगाव टोलनाका येथे गाडी अडवून त्यांच्याकडून पाच हजार रुपये आणि मद्याच्या बाटल्यांचा बॉक्स घेतला. याच प्रकरणाची त्यांनी तक्रार केल्यानंतर कळवा पोलिसांनी सापळा रचून अमोल देवळेकर या तोतया पोलिसाला अटक केली.* कॉरंटाईन असतांनाही खंडणीचा उकळलीमहेश याला कोरोना संशयित असलेल्या साकीनाका वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने या खंडणीसाठी मदत केली. त्याला कॉरंटाईन करण्यात आले आहे. तरीही तो या प्रकरणात अडकल्याने त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
धक्कादायक! मुंंबईतील कोरोना संशयित पोलीस अडकला खंडणीच्या गुन्हयात
By जितेंद्र कालेकर | Updated: July 7, 2020 00:04 IST
मद्याची वाहतूक करणाऱ्यांकडून पाच हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी रविवारी एका तोतया पोलिसाना अटक केली आहे. विशेष म्हणजे एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे कॉरंटाईन झालेल्या मुंबईतील साकी नाका वाहतूक शाखेचा एक पोलीस हवालदारही यात सामील असल्याची माहिती चौकशीतून पुढे आल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
धक्कादायक! मुंंबईतील कोरोना संशयित पोलीस अडकला खंडणीच्या गुन्हयात
ठळक मुद्देठाण्यातील वाहन चालकांकडून उकळले पैसे तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी केली अटकअतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कळवा पोलिसांनी टाकला छापा