धक्कादायक! ठाण्यात दुधाच्या टेम्पोच्या धडकेमध्ये मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 10:23 PM2020-02-16T22:23:34+5:302020-02-16T22:27:12+5:30

टेम्पोने दिलेल्या धडकेमुळे जॉन श्रीसुंदर (३४) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास कॅडबरी जंक्शन येथे घडली.

 Shocking! A motorcyclist dies in a collision with a milk tempo in Thane | धक्कादायक! ठाण्यात दुधाच्या टेम्पोच्या धडकेमध्ये मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

नौपाडा पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देटेम्पो चालकास अटकनौपाडा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टेम्पोच्या धडकेत जॉन सायमन श्रीेसुंदर (३४, रा. शेलारपाडा, कोलबाड, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पोचालक नबीसाहब महंमद मुल्ला मोहंमद मुल्ला (२९, रा. सानपाडा, नवी मुंबई, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
जॉन हे त्यांच्या मोटारसायकलने १६ फेब्रुवारी रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई ते नाशिकच्या दिशेने पूर्व द्रुतगती मार्गावरून जात होते. त्याचवेळी मुल्ला याचा दुधाचा टेम्पो खोपट बाजूकडून वर्तकनगरच्या दिशेला जात असताना जॉन यांच्या मोटारसायकलला कॅडबरी जंक्शनजवळ जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये टेम्पोच्या चाकाखाली येऊन जॉन गंभीर जखमी झाले. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.पी. सोनवणे, मिलिंद मोरे आणि धुरी यांनी तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी त्याच्या पॅण्टच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. तत्पूर्वी, त्याच्या मृतदेहाची जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. टेम्पोचालक नवीसाहब याच्याविरुद्ध कलम २७९ आणि ३०४- अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Shocking! A motorcyclist dies in a collision with a milk tempo in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.