शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नाकाबंदी चुकविण्यासाठी परप्रांतीयांची चक्क नाल्यातून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 02:36 IST

नाकाबंदी चुकविण्यासाठी परप्रांतीय मजूरांनी कुटूंबीयांसह एका ठाण्यातील एका नाल्यातून प्रवास केला. याचीच राज्य शासनाने गंभीर दखल घेतली. त्यानुसार पोलिसांनी या परप्रातीयांना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सोडले. आणखी काही बसेसमधून या परप्रांतीयांना लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाने घेतली गंभीर दखल सर्व पादचारी परप्रांतीयांना एसटीने सोडण्याची केली तजवीज

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: परराज्यातील मजूरांनी पोलिसांची नाकाबंदी चुकविण्यासाठी चक्क ठाण्यातील आनंदनगर टोलनाका येथील नाल्यातून पायपीट करीत गावचा रस्ता धरल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मजुरांना ताब्यात घेऊन तीन बसमधून मध्यप्रदेशच्या सीमेवर कोपरी पोलिसांनी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरी, आनंदनगर टोलनाक्यावरून पुढे पोलीस अडवित असल्यामुळे रविवारी पहाटेच्या सुमारास पूर्व दू्रतगती मार्गालगतच्यास एका नाल्यातून शेकडो मजूर आपल्या कुटूंबासह जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्रण रविवारी व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानंतर कोपरी पोलिसांनी या परप्रांतीयांना ताब्यात घेतले. रात्रीच्या अंधारात चक्क नाल्यातून हे मजूर आपल्या कुटूंबातील महिला आणि मुलांसह मार्गक्रमण करीत होते. नाल्यातून रस्ता पार करताना काही स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे डबेही दिले. दरम्यान, कोपरी पोलिसांनी या मजुरांसह अन्यही परप्रांतीयांच्या नावांची यादी करुन ४४ मजूरांना दोन बसेसने रविवारी शिरपूरकडे रवाना केले. दरम्यान, नौपाडा पोलिसांनीही अशाच दोन बसेसद्वारे ४४ परप्रांतीयांनाही एसटी बसने मध्यप्रदेशच्या सीमेवर रवाना केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस