शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

धक्कादायक! ठाण्यात नोकरी न सोडल्याने लोखंडी रॉडने पतीने केली पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:44 PM

नोकरी सोडली नाही तर घटस्फोटाची धमकी देत पत्नीला लोखंडी रॉडने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याची घटना ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात घडली आहे. या घटनेने संबंधित पतीविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोकरी न सोडल्यास सोडून देण्याचीही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कामावर गेलीस तर तुला सोडून देईल आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करील, अशी धमकी देत पूनम पासी (२५) या पत्नीला लोखंडी रॉडने जबर मारहाण करणाºया संजय पासी (३२, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या पतीविरुद्ध बुधवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.वागळे इस्टेट शिवाजी वाडी चाळ याठिकाणी वास्तव्याला असलेल्या पासी दांम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पूनम यांच्या नोकरी करण्यावरुन वाद सुरु आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान पूनम या नेहमीप्रमाणे वागळे इस्टेट येथील एएस बुक डेपो येथे नोकरीलला गेल्या. मात्र, या नोकरीच्या ठिकाणी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा पती संजय त्याठिकाणी आला. त्या कामात व्यस्त असतांनाच त्याने त्यांना शिवीगाळ केली. ‘तू इथे कामावर का आलीस, तुला सांगितले होते ना जर तू कामावर गेलीस तर तुला सोडून देईल आणि दुसºया मुलीसोबत मी लग्न करील,’ अशी धमकी देत त्याने त्यांना लोखंडी रॉडने त्यांच्या पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात संजयविरुद्ध तक्रार दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पानसरे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र