शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यातील नाल्यात पडून जीम प्रशिक्षकाचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 19:28 IST

कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरु असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या मोटारसायकलवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे ठेकेदाराविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा हलगर्जीपणाचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरु असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या मोटारसायकलवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध हलगर्जीपणा तसेच मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.प्रसाद हा आपल्या ठाण्यातील सावरकरनगर येथील मित्राकडे काही कामानिमित्त रात्री आला होता. तो मंगळवारी पहाटेच्या सुमारास संभाजी नगर, वागळे इस्टेट, क्रिटीकेअर हॉस्पीटल समोरील रस्त्याने जात होता. जवळच नाल्याच्या डायव्हर्शनचे बांधकाम सुरु आहे. नेमकी या बांधकामाच्या ठिकाणी जिथे कोणताही आडोसा नव्हता, त्याच ठिकाणाहून प्रसाद मोटारसायकलवरुन आत शिरला. यात तो १२ फूट खोल नाल्यात कोसळला. त्याची मोटारसायकल एका वाहिनीवर आदळली. पडल्यानंतर अर्ध्या तासाने काही स्थानिकांच्या लक्षात आले. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, अग्निशमन दलासह वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी या पथकांनी मदतकार्यही केले. मात्र, प्रसादचा जीव वाचू शकला नाही. दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी पुरेसे संरक्षक बॅरिकेटस् किंवा अन्य साधनसामुग्री उभी न करता हलगर्जीपणा करणाºया संबंधित कामाच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात