शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात बालिकेचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 22:25 IST

पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात ऋत्वी पालशेतकर या चार वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देआकस्मिक मृत्युची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात ऋत्वी पालशेतकर या चार वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद पोलिसांनी केली आहे.घोडबंदर रोड येथील डेफोडील सोसायटीमधील रहिवाशी राजू पालशेतकर यांच्या घरी १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. हे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर राजू यांची पत्नी आणि मुलगी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरात गेले. त्यावेळी पेस्ट कंट्रोलच्या उग्र वासामुळे १४ मार्च रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ऋत्वी हिला उलटी झाली. तर त्यांच्या पत्नीला मळमळ सुरु झाली. त्यामुळे दोघींनाही तात्काळ त्यांनी जवळच्याच एका खासगी रुग्णालयात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ऋत्वी हिचा रविवारी सायंकाळी मृत्यु झाल्याची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. फड हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात