लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अवघ्या दोन हजारांच्या मोबाईलसाठी आकाश वर्मा (१८) या रेल्वे प्रवाशाचा गळा आवळून दोघांनी जबरी चोरी केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नालासोपारा (जि. पालघर) भागात राहणारा आकाश हा काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. तो कामयानी एक्सप्रेसने ठाणे रेल्वे स्थानकात ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उतरला. तो ५ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरुन पायी जात होता. त्याचवेळी एका २० वर्षीय तरुणाने त्याच्या खांद्यावर थाप मारुन त्याचा गळा आवळला. तर त्याच्या अन्य एका साथीदाराने आकाशच्या उजव्या हातातील सुमारे दोन हजारांचा मोबाईल जबरदस्तीने खेचला. त्याने आरडाओरडा करण्यापूर्वीच या दोघांनीही तिथून पळ काढला. एरव्ही, केवळ हातातून मोबाइल हिसकावणाऱ्या चोरटयांची आता अगदी प्रवाशांचा गळा आवळण्यापर्यंत मजल गेल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे. आकाशने याप्रकरणी ५ सप्टेंबर रोजी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे हे या गुन्हयाचा तपास करीत आहेत.
धक्कादायक! ठाण्यात प्रवाशाचा गळा आवळून केली मोबाईलची जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 23:29 IST
ठाण्यात आकाश वर्मा (१८) या रेल्वे प्रवाशाचा गळा आवळून दोघांनी मोबाईलची जबरी चोरी केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर घडली. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! ठाण्यात प्रवाशाचा गळा आवळून केली मोबाईलची जबरी चोरी
ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मोबाईल हिसकावून दोघांचे पलायन