शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यातील वकीलाच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 00:03 IST

एरव्ही, आरोपींना नोटीस बजावणाऱ्या ठाण्यातील कोपरी येथील वकील दिलीप आसवानी यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात २२ हजारांच्या दोन इलेक्ट्रॉनिक बे्रकर मशिन चोरीचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला आहे. या मशिनही आसवानी यांच्या घरातून त्यांच्या मुलाच्या साक्षीने कोपरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देघरातूनच मिळाला चोरीतील मुद्देमालकोपरी पोलिसांनी बजावली नोटीस

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एरव्ही, पक्षकारांना नोटीस बजावणाºया ठाण्यातील कोपरी येथील वकील दिलीप आसवानी यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात २२ हजारांच्या दोन इलेक्ट्रॉनिक बे्रकर मशिन चोरीची तक्रार मंगळवारी दाखल झाली आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराच्या संशयावरुन या मशिनही आसवानी यांच्या घरातून त्यांच्या मुलासमोरच कोपरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरी येथील सुमारे ४० वर्षे जुनी असलेल्या लाल महाल या तळ अधिक तीन मजली इमारतीमध्ये तिसºया मजल्यावर अ‍ॅड. आसवानी यांचे घर आहे. आसवानी यांचे आणि इमारतीमधील रहिवाशांमध्ये इमारतीच्या दुरुस्तीवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद आहेत. सध्या इमारत दुरुस्तीच्या कामाचा ठेका सिद्धेश पिंगुळकर यांना दिलेला आहे. १ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.१५ ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान लाल महाल इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये ठेवण्यात आलेले २२ हजारांचे दोन इलेक्ट्रॉनिक ब्रेकर मशिन चोरीस गेले. हे मशिन आसवानी यांनीच चोरुन त्यांच्या लाल महाल इमारतीमधील घरात लपवून ठेवल्याचा संशय ठेकेदार पिंगुळकर यांनी कोपरी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये व्यक्त केला. त्याच आधारे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या पथकाने आसवानी यांचा मुलगा हिरेन आसवानी याला त्यांची खोली उघडण्यास सांगितले. तेंव्हा याच खोलीतून हिरेन याच्या साक्षीनेच पोलिसांनी ही ब्रेकर मशिन जप्त केली. साक्षात वकीलाविरुद्ध चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही सावध पवित्रा घेत आधी दिलीप आसवानी यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत रितसर नोटीस बजावली. बुधवारी सकाळी ११ ऐवजी दुपारी ४ वाजताची त्यांनी वेळ घेतली. मात्र, ते पोलीस ठाण्यात हजरच झाले नाही. अशा गुन्हयात तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते, असेही एका पोलीस अधिकाºयाने सांगितले. दरम्यान, वकीलाविरुद्ध चोरीची तक्रार दाखल झाल्याने ठाणे न्यायालय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला होता.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी