शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कल्याण एपीएमसी मार्केटच्या मागे जळालेल्या अवस्थेत सापडली 10,000 व्होटर कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 21:15 IST

मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर कार्ड तयार करून घ्या. त्यात दुरुस्ती करून घ्या, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून सातत्याने केले जात आहे.

कल्याण- मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर कार्ड तयार करून घ्या. त्यात दुरुस्ती करून घ्या, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून सातत्याने केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कल्याण एपीएमसी मार्केटच्या मागच्या बाजूला दहा हजार व्होटर कार्ड मिळाली आहेत. त्यापैकी अर्धी व्होटर कार्ड जळालेल्या अवस्थेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा प्रकार एका जागरुक नागरिकाने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.एपीएमसीचा परिसर 40 एकर जागेचा आहे. या ठिकाणी मोकळ्या जागेत काही मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आढळून आला. त्यांनी जागरुक नागरिक आजम शेख यांना पाचारण केले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्या ठिकाणी बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. मिळून आलेली काही व्होटर कार्ड ही कल्याण खडकपाडा परिसरातील नागरिकांची असल्याचे त्यावरील पत्त्यावरून दिसून येत आहे. अर्धी कार्डे जळालेली होती. त्यात बहुतांश नावे ही मुस्लीम मतदारांची दिसून येत आहे. मिळून आलेली कार्डे ही फेक आहेत की, ओरिजनल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फेक आहे तर ती कोणी बनविली. त्याचे हे कृत्य उघड होण्याच्या बेतात असल्याने त्याने ती जाळली असावी.मुस्लिम मतदारांची कार्डे जास्त असतील तर मुस्लिम विरोधी पक्षाकडून त्यांना मतदान मिळणार नाही म्हणून त्यांची कार्डे नष्ट करण्याचा हा प्रताप असावा. खरी वोटर कार्डे जाळून मतदारांच्या हक्कावर गदा आणणे. त्या प्रभागातील मते कमी करणे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येऊ नये या विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. आता खरी कसोटी पोलिसांची आहे. लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी मतदान आवश्यक आहे. मतदानासाठी व्होटर कार्ड आवश्यक आहे. तेच नसेल तर लोकशाहीचा हक्क कसा बजाविणार असा प्रश्न आहे. त्यासाठी या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे व्होटर कार्डे तयार करणारी यंत्रणाही संशयाच्या भोव-यात आली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण