शिवसेनेत घराणेशाहीचा वरचष्मा
By Admin | Updated: February 4, 2017 03:29 IST2017-02-04T03:29:27+5:302017-02-04T03:29:27+5:30
जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून पक्षातील घराणेशाहीची परंपरा शिवसेनेने आपल्या यादीत कायम राखली. बंड थोपवण्यासाठी
शिवसेनेत घराणेशाहीचा वरचष्मा
ठाणे : जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून पक्षातील घराणेशाहीची परंपरा शिवसेनेने आपल्या यादीत कायम राखली. बंड थोपवण्यासाठी पक्षाने केलेल्या व्यूहरचनेला यश आले असले, तरी अनेक निष्ठावान शिवसैनिकांची नाराजी कायम आहे. त्यातील काहींनी थेट बंडखोरी केली आहे.
अर्ज भरण्याची वेळ संपल्यावर शिवसेनेने शुक्रवारी सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात ५० विद्यमान नगरसेवकांना पुन्हा तिकीट दिले आहे. अन्य पक्षांतील १५ विद्यमान नगरसेवकांनाही संधी दिली आहे. खुल्या प्रवर्गातून उमेदवारी मिळू शकत नसलेल्या पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांच्या पत्नीला रिंगणात उतरवण्यात आले आहे. १७ विद्यमान नगरसेवकांना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. यात ११ महिलांचा समावेश आहे. १३१ पैकी १२० जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे केले असून मुंब्य्रातील ११ जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. ठाणे महापालिकेवर एकहाती सत्ता प्राप्त करण्यासाठी
यांचे पत्ते कापले...
संभाजी पंडित, स्नेहा पाटील, पूजा वाघ, नम्रता भोसले, अश्विनी जगताप, विशाखा खताळ, संजय मोरे, आशा कांबळे, प्राजक्ता खाडे, सुशीला यादव, दशरथ पलांडे, जितेंद्र वाघ, मनप्रीत स्यान, काशिराम राऊत, सारिका सोनार, अवंतिका पाटील, बालाजी काकडे या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.
महापौर संजय मोरे हे निवडणूक लढवणार नसल्याने त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे. संभाजी पंडित यांच्या पत्नीला, सुशील यादव यांच्या मुलाला, जितेंद्र वाघ यांच्या पत्नीला, मनप्रीत स्यान यांच्या पतीला आणि सारिका सोनार यांच्या पतीला तिकिटे देऊन शिवसेनेने भाऊबंदकी कायम राखली आहे.
माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांना आणि पत्नी व सुनेला उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या भोईर कुटुंबाला चार जागा देण्यात आल्या आहेत. आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नीला, भावाच्या पत्नीला, आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नीसह मुलाला, आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाला, खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि पुतण्याला, माजी आमदार अनंत तरे यांचा भाऊ आणि भावजयीला, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाला तिकीट देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात बंडखोरी
शिवसेनेत मोठ्या प्रमाणात घराणेशाहीची लागण झाल्याने जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये रोष उफाळून आला आहे. याची सुरु वात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून झाली आहे. शिंदे यांचे शाळकरी मित्र आणि विश्वासू सहकारी माजी ज्येष्ठ नगरसेवक बाळा घाग यांनी बंडाचे निशाण फडकावत राष्ट्रवादीमधून आणि त्यांच्या पत्नीने प्रभाग क्र मांक १७ मधून उमेदवारी दाखल केली. माजी नगरसेवक मदन कदम यांनीही पत्नी नीता कदम यांच्यासह चार उमेदवारांचे पॅनल तयार केले आहे. अश्विनी जगताप यांनी प्रभाग क्र मांक १८ आणि प्रभाग
क्र मांक ३ मधून आनंद केसरे यांना पक्षाच्या एबी फॉर्म दिला नसताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना म्हणून दाखल केला आहे. शिवसेनेचे वागळे उपविभागप्रमुख अजिनाथ वायकुळे यांनी प्रभाग १५ ब मध्ये बंडखोरी करून अर्ज दाखल केला आहे.