शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

Coronavirus: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शून्य किंमत; शिवसैनिकांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 13:25 IST

'कोरोना'ची दहशत असताना ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळ

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शिवसैनिकांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजनगर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनामुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर

ठाणे: जगभरात 'कोरोना'चे थैमानाचे सुरू असल्याने सरकार आणि प्रशासनाने जास्त गर्दी होऊ यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी व्यायामशाळा, मॉल, जलतरण तलाव, चित्रपटगृहांवर सरसकट बंदी लागू केली. तर ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही  त्यांनी १५ दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला. मात्र शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. तरीही ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर परिसरातील शिवसैनिक दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणार्‍या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या आशीर्वादाने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंञी महोदयांचे आदेश डावलून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे शहरभर होर्डिंग लावत दिमाखदार उद्घाटनही झाले असून परिसरात नेहमी सामाजिक कार्य करणार्‍या दिशा ग्रुपच्या बैरीशेट्टी दाम्पत्याकडून तरी 'कोरोना'चे सावट असताना नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची अपेक्षा नव्हती.एकीकडे हिंदू नववर्षाच्या स्वागताचा मानबिंदू असणार्‍या जिल्ह्यातील गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रांवर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातलेली असताना व सातारा जिल्ह्यातील बावधनच्या पारंपारिक 'बगाड' यात्रेच्या आयोजनानिमित्त संबंधितांवर 'कोरोना' नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी कारवाईच्या तयारीत असताना ठाण्यातील अशा मिसळ महोत्सवावर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.- संदीप दिनकर पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे