शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उड्डाणपुलावर सेना-राष्ट्रवादी आमनेसामने; आधी घोषणाबाजी नंतर गळ्यात गळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 07:22 IST

शिंदे-आव्हाडांकडून दोस्तीच्या आणाभाका; खारेगावात महाविकास आघाडीत घोषणायुद्ध

ठाणे  : मागील काही दिवसांपासून खारेगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार कलगीतुरा रंगला होता. शनिवारी उद्घटनाच्या दिवशी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परस्परांच्या समोर उभे राहून तुफान घोषणाबाजी केल्याने महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांमधील पूल किती डळमळीत असल्याचे दर्शन महाराष्ट्राला घडले. ‘एकनाथ शिंदे आगे बढो’च्या घोषणा शिवसैनिक देत होते तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’ या घोषणाबाजीने प्रत्युत्तर देत होते. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची तारेवरची कसरत सुरू होती. शनिवारी या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड येणार असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते झेंडे, बँनर घेऊन दुपारपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होते. राष्ट्रवादीचे व शिवसेनेने श्रेय घेणारे बॅनर दोन्हीकडे लागल्याचे दिसत होते. राष्ट्रवादीच्या बॅनरवर ‘वचनपूर्ती’ असा उल्लेख होता, तर शिवसेनेच्या बॅनरवर ‘सततच्या पाठपुराव्याला यश’ असा उल्लेख होता. कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी कार्यकर्त्यांमध्ये तुफान घोषणायुद्धाला सुरुवात झाली. पाठपुरावा महत्त्वाचा - श्रीकांत शिंदेखारेगाव पुलासाठी यापूर्वी प्रयत्न झाले असतील, मात्र पाठपुरावा महत्त्वाचा असतो. २००८-०९ मध्ये या पुलासाठी प्रयत्न झाले. परंतु खऱ्या अर्थाने २०१४ नंतर पाठपुरावा झाला. राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव न घेता, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. कोपरीपेक्षा कळवा - मुंब्य्राला पालकमंत्र्यांनी दोन हजार कोटींचा निधी दिला असून यातून पालकमंत्री शिंदे यांचे आव्हाड यांच्यावर किती प्रेम आहे, याची जाणीव होते.जितेंद्र आव्हाड म्हणाले :  एकनाथ शिंदे आणि माझी मैत्री फार वेगळी आहे, त्यांच्याकडे केव्हाही निधी मागितला तर त्यांनी तो दिला नाही, असेच कधीच घडले नाही. शिंदे आणि माझ्यात एका अबोल मैत्रीचे ऋणानुबंध आहेत, तो धागा तुटणार नाही, याची काळजी श्रीकांत शिंदे यांनी घ्यावी आणि हा धागा आणखी मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमाची पत्रिका छापतांना एकदा विचारले असते तर आम्ही पुढाकार घेतला असता आणि वाद, घोषणाबाजीची वेळ आली नसती. जयंत पाटील यांच्या हातून पुलाचे लोकार्पण व्हावे अशी इच्छा यापूर्वी आपण व्यक्त केली असली तर त्यानंतर झालेल्या वादानंतर पुन्हा मीच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे असेही स्पष्ट केले होते. आपला प्रमुख शत्रू कोण आहे, हे ओळखून आपण एकत्र येणे गरजेचे असून ठाण्यात महाविकास आघाडी व्हावी ही पूर्वीही इच्छा होती आणि आतादेखील आहे. एकनाथ शिंदे म्हणाले : शिवसेनेचे मिशन कळवा हे महाविकास आघाडीचे नगरसेवक अधिक संख्येने निवडून आणण्याकरिता आहे.  तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीदेखील मिशन वागळे राबवा आम्ही तुम्हाला अडविणार नाही. पण मिशन सोडून कमिशनला हात लावणे अयोग्य आहे, कोणावरही वैयक्तिक टीका करणे अयोग्य असून मी कधीही पालिकेत माझी फाईल मंजूर करा, असे सांगितले नाही, त्यामुळे टीका करताना सांभाळून  करा. आव्हाड आणि माझी मैत्री आहे. पक्षाच्या हिताकरिता आम्ही आमच्या भूमिका बदलेल्या असतील तरी आमची मैत्री कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका निवडणुकीत काम करू या. पुलाच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधातील बॅनर लागले, घोषणाबाजी झाली, मात्र हे यापुढे करू नका.उद‌्घाटन नेमके कोणाच्या हस्ते..? नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड दोघांनीही रिबीन धरून ठेवली होती. दोघांच्याही हातात कात्री होती. त्यामुळे उद्घाटन नेमके कोणाच्या हस्ते? हा मुद्दा गुलदस्त्यात राहिला...

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना