शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

राजन विचारेंनी घेतला उमेदवारी अर्ज; पण महायुतीच्या गोटात शुकशुकाट, उमेदवार कोण?

By रणजीत इंगळे | Published: April 26, 2024 7:22 PM

महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Thane Lok Sabha ( Marathi News ) : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी अद्याप महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज घेण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे असून २७ एप्रिल, २८ एप्रिल आणि १ मे रोजी सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राजन विचारे यांसह  ४ उमेदवारी अर्ज घेण्यात आले असून भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज घेण्यात आला नाही. उमेदवारी अर्ज घेतलेल्या नेत्यांमध्ये भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २,  पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसान पार्टी २ आदी राजकीय पक्षांचा समावेश आहे.

भाजपच्या इच्छुकांकडून सुरू आहे प्रचार

ठाण्याचा तिढा अजून सुटला नसला, तरी भाजपचे इच्छुक संजीव नाईक यांनी मात्र जागा वाटपाआधीच उमेदवार म्हणून प्रचार सुरूच ठेवला आहे. त्यामुळे शिंदेसेनेवर उद्धवसेनेने टीकेचे बाण चालवण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करूनही बालेकिल्ला राखण्यासाठी शिंदेसेनेला झगडावे लागत आहे. नाईक भाजपमधील माजी नगरसेवक, प्रमुख लोकांच्या घरोघरी भेटीगाठी घेत आहेत. निवासी संकुलातील नागरिक, समाजातील प्रमुख मंडळींच्या भेटी घेत आहेत. 

खा. विचारे यांच्यासमोर लढण्यासाठी शिंदेसेनेकडे उमेदवारच नसल्याने त्यांना भाजपला जागा सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नाईक यांनी उघडपणे सुरू केलेला प्रचार ही शिंदेसेनेची नामुष्की आहे, असे त्यांनी म्हटले आहे, तर शिंदे गटात गेलेल्यांची अवस्था बिकट असून, ठाण्याचा गड म्हणवणाऱ्या शिंदेसेनेला भाजप जागा सोडत नाही. मग विधानसभा आणि पालिका निवडणुकीत त्यांची अवस्था किती बिकट होईल, याची कल्पना न केलेली बरी, असा टोला उद्धवसेनेचे मीरा-भाईंदर उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम यांनी नुकताच लगावला होता.

टॅग्स :thane-pcठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४