कोकणवासीयांना मदतीसाठी शिवसेनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST2021-07-28T04:41:53+5:302021-07-28T04:41:53+5:30

अंबरनाथ : कोकणात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर कोकणाला सध्या मदतीची गरज आहे. अशातच मुख्यमंत्री आणि ...

Shiv Sena's initiative to help the people of Konkan | कोकणवासीयांना मदतीसाठी शिवसेनेचा पुढाकार

कोकणवासीयांना मदतीसाठी शिवसेनेचा पुढाकार

अंबरनाथ : कोकणात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर कोकणाला सध्या मदतीची गरज आहे. अशातच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा न करता त्या खर्चात पूरग्रस्त कोकणवासीयांना मदत पोहोचविण्याचा निर्णय शिवसेना शहर शाखेने घेतला आहे.

कोकणातल्या महाड, चिपळूण, खेड या परिसरात पुरामुळे अक्षरशः हाहाकार माजला आहे. दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणाला मदत करण्याचे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलैला असलेला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन स्वतः उद्धव ठाकरे यांनीच केले आहे. त्यामुळे आता हा वाढदिवस मदतकार्याने साजरा करण्याचा निर्णय अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेने घेतला आहे. यासाठी मंगळवारी शहर शाखेत शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील कारखानदार, व्यापारी, उद्योजक, राजकारणी यांच्याप्रमाणेच सर्वसामान्यांनाही कोकणात काही मदत पोहोचवायची असल्यास ती शिवसेना शहर शाखेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर २८ जुलैला ही मदत घेऊन अंबरनाथचे शिवसैनिक महाड आणि चिपळूणला रवाना होणार असल्याची माहिती अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली आहे.

----------------------------------------------

Web Title: Shiv Sena's initiative to help the people of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.