शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये शिवसेनेचा ‘घंटानाद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:33 IST

देवीच्या दर्शनासाठी शिवसैनिकांची कूच; १00 कार्यकर्ते ताब्यात

कल्याण : बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी हिंदूंना मज्जाव केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने यावर्षीही घंटानाद आंदोलन केले. ईदगाहला लागूनच असलेल्या मंदिरात बुधवारी सकाळी नमाज पठणाच्यावेळी दर्शनासाठी जाऊ पाहणाऱ्या शिवसैनिकांची वाट पोलिसांनी रोखून धरली. यावेळी शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.टिळक चौकात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून श्री गणेशाची आरती म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी मंदिराची वाट धरली. शिवसेनेकडून दरवर्षीच आंदोलन केले जात असल्याने पोलीस आधीच सतर्क होते. त्यामुळे लाल चौकीपासून थोड्या अंतरावर दुर्गाडी चौकाच्या आधीच पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून कार्यकर्त्यांची वाट रोखून धरली. शिवसेनेचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी, महापौर विनीता राणे, सभागृह नेते श्रेयस समेळ, पदाधिकारी रवींद्र कपोते, महिला आघाडीच्या विजया पोटे, गणेश जाधव, कैलास शिंदे, सचिन बासरे, राजेंद्र दीक्षित, अरविंद मोरे आदी महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलनात सहभाग घेतला. जवळपास १०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी दोन बसने मानपाडा पोलीस ठाण्यात नेले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी पोलीस ठाण्यास भेट दिली.कार्यकर्त्यांना दर्शनास मज्जाव केल्याबद्दल पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्यावर शिवसैनिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. नमाजपठणाच्या कालावधीत मंदिरातील घंटा झाकून ठेवली जाते. मंदिरप्रवेशही नाकारला जातो. त्याची पूर्वसूचना पोलिसांकडून काढली जाते का? त्याची पूर्वप्रसिद्धी वर्तमानपत्रांतून केली जाते का, असे सवाल साळवी यांनी केले. उपायुक्त त्यावर काहीही बोलू शकले नाही.दुर्गाडीदेवीच्या मंदिराला लागून ईदगाहची जागा आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम आणि हिंदूंमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर प्रवेश बंद केला जातो. १९८६ साली शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी हे आंदोलन सुरू केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkalyanकल्याण