शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गीता जैन यांनी धरली शिवसेनेची कास, भाईंदरमध्ये भाजपला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:31 IST

महापौर-उपमहापौर निवडणूक; समर्थक नगरसेवक सेनेसोबत

मीरा रोड : विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपचे गुणगाण गाणाऱ्या आमदार गीता जैन यांनी मीरा-भार्इंदरच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेची कास धरल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. पालिकेतील सत्ता सहभागात भाजप नेतृत्वाकडून सातत्याने केवळ आश्वासनेच मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. भाजप नेतृत्व सतत नरेंद्र मेहतांना झुकते माप देत असल्याने त्या संतापल्या होत्या.गीता जैन यांनी भाजपतील त्यांच्या चार नगरसेवकांसह शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे स्थानिक राजकारणात त्या सेनेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट आहे. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तारुढ असल्याने विरोधी बाकावरील भाजपसोबत राहिल्यापेक्षा शिवसेनेशी जवळीक साधून दोन कामे करुन घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.भाजपने हाणून पाडले विरोधकांचे डावपेचमहापौरपदासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मर्जीतील रूपाली शिंदे-मोदी तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांची नावे आघाडीवर होती. पण, भाजपच्या ४५ नगरसेवकांनी जसनाळे यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे आधीच नाराजी, त्यात फुटीची चिन्हे पाहून चव्हाणांनी स्वत:च्या हातात सूत्रे घेतली. नगरसेवकांचे पहिल्यांदाच व्यक्तिगत मत विचारले गेल्याने हसनाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उपमहापौरपदासाठी मेहता समर्थक ध्रुवकिशोर यांचा पत्ता कापल्याने त्यांचेच दुसरे समर्थक गेहलोत यांना उमेदवारी देण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह, प्रभात पाटील, रीटा शाह यांच्यासह अन्य इच्छुकांना डावलल्याने नाराजीचा सूर होता. त्यातच शिवसेना आणि गीता जैन यांच्याकडून भाजपला सुरुंग लावण्याची भीती असताना चव्हाण यांनी विरोधकांची खेळी यशस्वी होऊ दिली नाही. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून सेना-काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा जोरदार प्रयत्न झाला. सेना-काँग्रेसच्या तीन नगरसेविका शेवटपर्यंत बेपत्ता राहिल्या.शिवसेनेचे दावे ठरले पोकळ : भाजपमधील अंतर्गत नाराजी तसेच इच्छुकांमधील मतभेदांवरून या निवडणुकीत चमत्कार घडवण्याच्या शिवसेना नेत्यांच्या वल्गनाच ठरल्या. या निवडणुकीसाठी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक व काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन हे जातीने उपस्थित होते. परंतु, महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेच्या शिर्केंना केवळ ३६ मतेच मिळाल्याने सर्वांनी काढता पाय घेतला. या निवडणुकीत सेना व काँग्रेसला त्यांच्या नगरसेवकांना सांभाळता आले नाही. भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा त्यांचा प्रयत्नदेखील सपशेल फसला.बंडखोरांवर करणार कारवाईभाजपच्या मॉरस रॉड्रिक्स, परशुराम म्हात्रे, वैशाली रकवी आणि अश्विन कासोदरिया या चार नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने, तर विजय राय गैरहजर राहिल्याने त्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची कारवाई तातडीने सुरू करणार असल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली. तसेच भाजपला सहकार्य करणाºया शिवसेना नगरसेविका अनिता पाटील, दीप्ती भट आणि काँग्रेसच्या सारा अकरम यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा शिवसेना आणि काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे भूमिगत नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांनी महाविकास आघाडीला मतदान केले. या दोन्ही नगरसेवकांनी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.सर्वांना सोबत घेऊन काम करणार - महापौरनवनिर्वाचित महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. या शहराने मला खूप काही दिले असून, महापौरपद मिळाल्याने जनतेचा आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन. त्याला तडा जाईल, असे काम होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना