पाणी टंचाईच्या निषेधार्थ मीरा - भाईंदरमध्ये शिवसेनेचे 'घागर फोडा' आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 06:26 PM2021-10-18T18:26:01+5:302021-10-18T18:30:07+5:30

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शहरातील पाणी टंचाईला सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे काही नेते व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत सोमवारी आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.

Shiv Sena's agitation in MIRA-Bhayander to protest water scarcity | पाणी टंचाईच्या निषेधार्थ मीरा - भाईंदरमध्ये शिवसेनेचे 'घागर फोडा' आंदोलन 

पाणी टंचाईच्या निषेधार्थ मीरा - भाईंदरमध्ये शिवसेनेचे 'घागर फोडा' आंदोलन 

googlenewsNext

मीरारोड- मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईला सत्ताधारी भाजपा व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेने शहरातील २ पालिका प्रभाग समिती कार्यालयां बाहेर मातीच्या घागरी फोडत निषेध केला . 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शहरातील पाणी टंचाईला सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे काही नेते व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत सोमवारी आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने आज सोमवार १८ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या भाईंदर पश्चिम, नगर भवन येथील प्रभाग समिती कार्यालय व मीरारोडच्या  शांती नगर , इंदिरा गांधी रुग्णालयातील प्रभाग समिती ५ च्या कार्यालया बाहेर मातीच्या घागरी फोडून सत्ताधारी भाजपाचा पाणी टंचाई बद्दल निषेध केला . 

मीरारोड येथे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांना मातीची रिकामी घागर व निवेदन दिले गेले . त्या आधी महिला उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर व उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक राजू भोईर व विक्रमप्रताप सिंह यांच्यासह शहरप्रमुख प्रशांत पालांडे , शहर संघटक श्रेया साळवी , दिलीप भोईर , सलमान हाश्मी, स्वाती देसाई , क्षमा गांधी, वीणा बद्रिके, रसिका पवार , सीमा रनवडे, सुभाष केसरकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक आदींनी बाहेर घागरी फोडून भाजपा व प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली . 

भाईंदर पश्चिम येथील नगरभावन प्रभाग समिती २ समोर उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील , शहरप्रमुख पप्पू भिसे , उपशहर प्रमुख शब्बीर कुरेशी , जितेंद्र पाठक, भगवान शर्मा, प्रमिला लाडे आदींसह शिवसैनिकांनी घागरी फोडून निषेध केला व घोषणा दिल्या. उर्वरित भाईंदर पूर्व प्रभाग समिती ३ , पूर्व व कनकिया समिती क्र . ४ आणि महामार्ग परिसर व मीरारोड प्रभाग समिती ६ च्या कार्यालयां समोर बुधवारी शिवसेना आंदोलन करणार आहे असे शहरशाखेच्या वतीने सांगण्यात आले. 

Web Title: Shiv Sena's agitation in MIRA-Bhayander to protest water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.