शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

उत्तर भारतीय नेत्याला शिवसैनिकांचा चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 00:32 IST

अंबरनाथमधील घटना । पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला राडा, अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

अंबरनाथ : शिवसेनेच्या उत्तर भारतीय नेत्याला अंबरनाथच्याच शिवसैनिकांनी चोप दिला आहे. आमदारांना प्रचारासाठी शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात नेत असताना नगरसेवकांना त्याची कल्पना दिली जात नसल्याच्या रागातून हा चोप दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घडला.

उल्हासनगरमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अंबरनाथमध्ये आले होते. त्या ठिकाणी शहरातील काही स्थानिक नेत्यांसोबत पालकमंत्र्यांनी चर्चाही केली. या चर्चेसाठी काही कार्यकर्ते आणि पदाधिकारीही अंबरनाथ स्टेशन परिसरातील एका हॉटेलसमोर उभे होते. पालकमंत्री आतमध्ये चर्चा करत असताना बाहेर एका नगरसेवकाचे शिवसेनेच्याच उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यासोबत वाद झाला. आमदारांना प्रचारासाठी आणताना हा उत्तर भारतीय पदाधिकारी पुढेपुढे करत असल्याची तक्रार यावेळी शहरप्रमुखांकडे करण्यात आली. याप्रकरणी शहरप्रमुखांनी मध्यस्थी करून या उत्तर भारतीय नेत्याची समजूतही काढली. शिवसेना नगरसेवकाच्या प्रभागात प्रचारासाठी येताना त्या स्थानिक नगरसेवकाला त्याची कल्पना देणे, ही शिवसेनेची शिस्त आहे. केवळ एकाच नव्हे तर दोन ते तीन प्रभागांत असा प्रकार घडल्याने यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना शहरप्रमुखांनी दिली.

शहरप्रमुख त्या ठिकाणाहून निघून गेल्यावर उत्तर भारतीय नेत्याचे एका शिवसेनेच्या नगरसेवकासोबत पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर, मात्र थेट हा प्रकार हाणामारीवर गेला. या उत्तर भारतीय नेत्याला एका नगरसेवकाने आणि त्या ठिकाणी असलेल्या काही अंगरक्षकांनी मारहाण केली. अखेर, पालकमंत्र्यांसोबत आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी मध्यस्थी करत हा प्रकार रोखला. शुक्रवारी झालेल्या या राड्यात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष समोर आला आहे.भाजपच्या रॅलीत नगरसेवक आणि नगरसेविकेच्या पतीमध्ये हाणामारीठाणे : भाजपच्या प्रचार रॅलीत शनिवारी प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक कृष्णा पाटील, तर नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड हे आपसात भिडले. अखेर, भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी मध्यस्थी करून हे भांडण मिटविले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ही रॅली काढण्यात आली होती.ठाणे : भाजपच्या प्रचार रॅलीत शनिवारी प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक कृष्णा पाटील, तर नगरसेविका दीपा गावंड यांचे पती प्रशांत गावंड हे आपसात भिडले. अखेर, भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी मध्यस्थी करून हे भांडण मिटविले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ही रॅली काढण्यात आली होती.त्यानंतर, कृष्णा पाटील यांचे नातेवाईक सचिन पाटील यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा वाद आणखी वाढल्यानंतर नगरसेवक कृष्णा पाटील आणि प्रशांत गावंड यांच्यात हाणामारी झाली. अखेर, वरिष्ठांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

टॅग्स :ambernath-acअंबरनाथShiv Senaशिवसेना