भाजपाला वगळून शिवसेना-साई पक्ष एकत्र
By Admin | Updated: January 25, 2017 04:50 IST2017-01-25T04:50:22+5:302017-01-25T04:50:22+5:30
ओमी कलानी भाजपाच्या वाटेवर असल्याने आधीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गुप्त बैठका सुरू असतानाच आता शिवसेना आणि साई पक्षानेही भाजपाला वगळून एकत्र येण्याची चर्चा सुरू केली आहे.

भाजपाला वगळून शिवसेना-साई पक्ष एकत्र
सदानंद नाईक / उल्हासनगर
ओमी कलानी भाजपाच्या वाटेवर असल्याने आधीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गुप्त बैठका सुरू असतानाच आता शिवसेना आणि साई पक्षानेही भाजपाला वगळून एकत्र येण्याची चर्चा सुरू केली आहे. दोन दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल, अशी माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत महायुतीला ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीतून फुटून ओमी कलानी आपल्या टीमसह भाजपाच्या प्रवेश वाटेवर आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रसेची बहुतांश कार्यकारिणी व नगरसेवक आहेत. टीमला प्रवेश दिल्यास युती अशक्य असल्याचे संकेत शिवसेनेने यापूर्वीच भाजप नेत्यांना दिल्यानंतर त्यांच्यातील युतीचा चर्चा थांबली. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना भेटण्याचे टाळत आहेत. शिवसेनने सिंधीबहुल परिसरात मेळावे घेतले असले, तरी तेथे उमेदवार मिळणे कठीण जात असल्याने त्यांनी साई पक्षासोबत युतीचे संकेत दिले. याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विचारता त्यांनी चर्चेला दुजोरा दिला. साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनीही शिवसेनेने युती संदर्भात विचारणा केल्याची प्रतिक्रिया दिली.