'महावितरण'च्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध; रास्ता रोको करत केलं आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:46 IST2020-08-27T17:44:58+5:302020-08-27T17:46:01+5:30
गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांनी आज दुपारी शांतीनगर येथील मुख्य रस्त्यावर अचानक रस्ता रोको आंदोलन केले.

'महावितरण'च्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध; रास्ता रोको करत केलं आंदोलन
उल्हासनगर : ऐण उत्सवा दरम्यान शांतिनगर, विठ्ठलवाडी, पवई, चोपड़ा कोर्ट आदी परिसरातील तीन ट्रांसफार्मर खराब झाल्याने गेल्या तीन दिवसापासून परिसर अंधारात आहें. अखेर संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी दुपारी रस्ता रोखो करीत वीज महावितरणच्या कारभाराचा निषेध केला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं -३ परिसरातील शांतीनगर, पवई, विठ्ठलवाडी, ढाले पाडा परिसरातील विजेचे तीन ट्रांसफार्मर खराब झाल्याने ऐण गणेश उत्सव दरम्यान परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. स्थानिक नागरिक व शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी वीज महावितरण मंडळाकडे पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच ट्रान्सफॉर्मर दुरस्तीं व बदली केली नाही. गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांनी आज दुपारी शांतीनगर येथील मुख्य रस्त्यावर अचानक रस्ता रो खो आंदोलन केले. आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह माजी महापौर व स्थानिक नगरसेविका राजश्री चौधरी, माजी नगरसेवक विजय सूपाले, शीवाजी जावळे, दीपक साळवे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. याबाबत वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता राठोड यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.
दरम्यान शहरातील वीजेच्या लंपडा वाला कंटाळून काँग्रेस पक्षाच्या पालिका गटनेत्या अंजली साळवे यांनी थेट वीज मंत्री नितीन राऊत यांच्याकडे साकडे घातले. कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरात दिवसाला ८ तासा पेक्षा जास्त वीज पुरवठा खंडित होत असल्याने ऑन लाईन शिक्षण घेणाऱ्या हजारो मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मंत्री यांनी देवून सुभाष टेकडी परिसरात विजेचा लंपडाव सुरू आहे.