शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शासकीय नोकरदारांची सर्वाधिक पसंती शिवसेनेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 23:12 IST

टपाली मतदानाचा निकाल । २१३ कर्मचाऱ्यांनी स्वीकारला ‘नोटा’चा पर्याय

पंकज रोडेकरठाणे : निवडणूक कामात व्यस्त राहणाºया शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील १८ विधानसभेच्या निवडणुकीत केलेल्या टपाली मतदानापैकी ५२ टक्के मते महायुतीला प्राप्त झाली आहेत. त्यामध्ये शिवसेनेला भाजपपेक्षा दोन टक्के अधिक मतदान झाले आहे. एकूण झालेल्या ७ हजार २३६ टपाली मतदानांपैकी ३ हजार ७९९ मते महायुतीच्या पारड्यात गेली तर २१३ शासकीय कर्मचाºयांनी २१३ उमेदवारांना ‘नोटा’ करुन नाकारले आहे.

ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीत भाजप,शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, वंचित आघाडी या प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण २१३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यावेळी मतदात्यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपच्या आठ उमेदवारांना पुन्हा: एकदा विजयी केले. शिवसेना-५, राष्ट्रवादी -दोन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी आणि अपक्ष यांचे प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून दिले आहेत. निवडणुकीच्या कामाकाजाला जुंपलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागामार्फत यावेळीही टपाली मतदान प्रक्रिया राबवली गेली. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील शासकीय नोकरदार वर्गाने पहिली पसंती सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना दिली. पक्षनिहाय विचार केल्यास शिवसेनेच्या उमदेवारांना पहिली पसंती दिली आहे. त्यानंतर आघाडीला त्याच्या खालोखाल महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदान केले आहे.भिवंडी पश्चिमेत ‘नोटा’चा वापर नाहीशासकीय नोकरदारांपैकी २१३ जणांनी चक्क ‘नोटा’ला पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक ३६ जणांनी ‘नोटा’द्वारे ठाणे शहर मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नाकारले आहे. त्यापाठोपाठ कल्याण पश्चिम, मुंब्रा-कळवा आणि कल्याण पूर्व येथील उमेदवारांना नाकारले. तर, भिवंडी पश्चिम मतदारसंघात शासकीय नोकरदारांनी ‘नोटा’चा वापर केलेला नाही.ठाण्यात सर्वाधिक टपाली मतदान : जिल्ह्यात १८ मतदारसंघातून एकूण ७ हजार २३६ टपाली मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार ५८ टपाली मतदान हे ठाणे शहर मतदारसंघात झाले असून त्यापाठोपाठ कल्याण पश्चिम येथे ७९७ तर सर्वात कमी टपाली मतदान भिवंडी पश्चिम येथे ७३ इतके झाले आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे