शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

By Admin | Updated: March 10, 2017 04:19 IST2017-03-10T04:19:54+5:302017-03-10T04:19:54+5:30

इमारतीच्या बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेविक ा माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे

Shiv Sena corporator's husband's fatal attack | शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

कल्याण : इमारतीच्या बांधकामाची तक्रार केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेविक ा माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर घराजवळच दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० जणांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. त्यात प्रशांत गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला विकासक व भाजपा पदाधिकारी संजय मोरे आणि शिवसेना उपशहर संघटक संजय गायकवाड यांनी केला आहे, असा आरोप नगरसेविक ा काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक ९९ ‘आमराई’च्या नगरसेविका काळे आणि त्यांचे पती प्रशांत हे बुधवारी रात्री १२ च्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून विजयनगर येथील आपल्या घरी परतत होते. ते घराजवळ पोहोचले असता त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० अनोळखी व्यक्तींनी प्रशांत यांच्यावर लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात ते जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
आमराई-विजयनगर प्रभागातील एका नवीन इमारतीच्या बांधकामाची माहिती नगरसेविका काळे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मागवली होती. त्यात विकासकांनी इमारतीच्या बांधकाम आराखड्यात तळमजल्यावर वाहनतळ असल्याचे दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या वाहनतळाच्या जागा विकासकांनी भिंती बांधून सदनिका, व्यापारी गाळे बांधून विकले आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विकासक मोरे व गायकवाड अडचणीत आले आहेत.
दरम्यान, विकासकांनी केलेल्या या नियमबाह्य कामाबाबत काळे गेल्या महिन्यापासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करीत आहेत. या पाठपुराव्यामुळे गायकवाड व मोरे अडचणीत आले आहेत. याच कारणामुळे पती प्रशांत यांच्यावर हा जीवघेणा झाला आहे. तसेच याच कारणावरू न त्यांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यातही अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप नगरसेविका काळे यांनी केला. (प्रतिनिधी)

- प्रशांत काळे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मी व माझे साथीदार संजय गायकवाड दोघेही आपल्या घरात होतो. तसे सीसीटीव्ही फुटेजही आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही. तसेच आमच्या कोणत्याही बांधकामात अनधिकृतपणा आढळल्यास त्यावर महापालिकेने कारवाई करावी, असेही विकासक व भाजपा पदाधिकारी संजय मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Shiv Sena corporator's husband's fatal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.