शिवसेना नगरसेविकेच्या मुलीवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 03:36 IST2017-08-14T03:36:45+5:302017-08-14T03:36:45+5:30
शिवसेना नगरसेविका सुशीला माळी यांच्या मुलीवर एका महिलेने लोखंडी वस्तूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

शिवसेना नगरसेविकेच्या मुलीवर हल्ला
कल्याण : शिवसेना नगरसेविका सुशीला माळी यांच्या मुलीवर एका महिलेने लोखंडी वस्तूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्ला करणाºया महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेविका माळी यांची मुलगी संगीता गवळी तिच्या पतीसह अनमोल गार्डन या इमारतीत राहते. संगीता हिला मानव नावाचा मुलगा आहे. मानव हा सोसायटीच्या गार्डनमध्ये खेळण्यास जातो. तसेच अन्य मुलेही गार्डनमध्ये खेळायला येतात. मात्र, सोसायटीच्या अध्यक्षा शशिकला सिंग मानवला गार्डनमध्ये खेळण्यास मज्जाव करतात. यावरून संगीता व शशिकला यांचा वाद झाला होता. त्याचा तक्रार अर्ज संगीताने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिला होता. त्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही.
शनिवारी सायंकाळी मानव खेळण्यासाठी गेला असता त्याला शशिकला यांनी मज्जाव केला. या कारणावरून शशिकला व संगीता यांच्यात वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. शशिकलाने संगीताला लोखंडी वस्तूने मारले.
तिला खाजगी रुग्णालयात
दाखल केले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शशिकलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.