शिवसेना नगरसेविका आणि पतीवर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: March 9, 2017 16:34 IST2017-03-09T16:34:19+5:302017-03-09T16:34:19+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने

शिवसेना नगरसेविका आणि पतीवर प्राणघातक हल्ला
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 9 - कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री 12 च्या सुमारास कल्याण पूर्वेत हा प्रकार घडला असून, सेना नगरसेविका माधुरी काळे यांनी सेनेच्याच पदाधिकाऱ्याने हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
माधुरी आणि प्रशांत काळे हे काल रात्री घरी चालले असताना बाईकवरून आलेल्या काही व्यक्तींनी हे दोघेही घराजवळ पोहोचताच त्यांच्यावर हल्ला केला. लाकडी दांडके आणि धारदार शस्त्राने सुमारे 8 ते 10 जणांनी प्रशांत काळे यांना अचानक मारायला सुरुवात केली. त्यात प्रशांत यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे माधुरी काळे यांनी सांगितले. सध्या प्रशांत काळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान कल्याण पूर्वेतीलच शिवसेना पदाधिकारी संजय गायकवाड आणि संजय मोरे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप काळेंनी केला आहे. तर ही घटना घडली त्यावेळी आपण आपल्या घरात होतो. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. याबाबत कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.