शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या दौऱ्यावर शिवसेनेचा बहिष्कार? अधिकृत आमंत्रणच दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 00:18 IST

महापौर लीलाबाई अशान यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. अधिकृत आमंत्रण नसल्याने उपस्थित नसल्याची प्रतिक्रिया महापौर अशान यांनी दिली.

उल्हासनगर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी झालेल्या दौºयावर सत्ताधारी शिवसेनेसह अन्य पक्षांनी अघोषित बहिष्कार घातला होता. महापौर लीलाबाई अशान यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. अधिकृत आमंत्रण नसल्याने उपस्थित नसल्याची प्रतिक्रिया महापौर अशान यांनी दिली.उल्हासनगरमधील आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी फडणवीस, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आले होते. त्यांनी शहरातील कोरोना रुग्णालयाला भेट देवून महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. मात्र महापौर यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक यावेळी उपस्थित नव्हता.याबाबत महापौर अशान यांना विचारले असता महापौर यांच्यासह अन्य सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना अधिकृत आमंत्रण दिले नव्हते. भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी मात्र सत्ताधारी पक्षाच्या वागण्यावर टीकाकेली.शहरातील आरोग्य सुविधा सुधारून त्याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांसाठी व्हावा म्हणून भर पावसात विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यासह भाजप टीम दौरा करीत आहेत. मात्र सत्ताधारी रस्त्यावर उतरण्या ऐवजी घरात बसून राजकारण करत असल्याचा आरोप रामचंदानी यांनी केला. इतर महापालिकेचे सत्ताधारी व विरोधी पक्षनेते हातात हात घालून कोरोनाचे संकट निवारण्यासाठी काम करीत आहेत.मात्र शहरात फक्त भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन नागरिकांच्या समस्या सोडून मदत करीत आहेत, असे रामचंदानी म्हणाले. तर शिवसेना उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी मात्र रामचंदानी यांचे आरोप फेटाळून, महापालिकेने आमंत्रण दिले असते तर, फडणवीस यांच्या दौºयात सहभागी झालो असतो, अशी प्रतिक्रियादिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा