आरक्षण सोडतीत शिवसेना-भाजपामध्ये जल्लोष

By Admin | Updated: December 23, 2016 03:00 IST2016-12-23T03:00:01+5:302016-12-23T03:00:01+5:30

भिवंडी महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रथमच चारसदस्यीय प्रभागरचना निर्माण केली असून

Shiv Sena-BJP in the reservation queue | आरक्षण सोडतीत शिवसेना-भाजपामध्ये जल्लोष

आरक्षण सोडतीत शिवसेना-भाजपामध्ये जल्लोष

वज्रेश्वरी : भिवंडी महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रथमच चारसदस्यीय प्रभागरचना निर्माण केली असून २०११ ची जनगणना प्रमाण मानून ९० सदस्य संख्या असलेल्या महानगरपालिकेतील आरक्षित प्रभागांची सोडत गुरुवारी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. मीनाताई रंगायतन येथे गोंधळाच्या परिस्थितीत पार पडली. या आरक्षणात विद्यमान महापौर तुषार चौधरी, उपमहापौर अहमद सिद्दीकी, माजी महापौर विलास पाटील, प्रतिभा पाटील, जावेद दळवी यांचे प्रभाग सुरक्षित झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. आरक्षणामुळे शिवसेना-भाजपाला जास्त फायदा होणार असल्याने त्यांनी जल्लोष केला, तर समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्ते व नेत्यांमध्ये नाराजी दिसत होती. एकूण जागा ९०, त्यापैकी महिलांकरिता ५० टक्के राखीव जागा आहेत.
पालिकेच्या २३ प्रभागांसाठी ९० वॉर्डांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. २०११ च्या जणगणनेनुसार भिवंडी महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या ७,०९,६५५ असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या २१८२०, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८१८७ असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांकाप्रमाणे ४ सदस्य असलेले २१, तर ३ सदस्य असलेले २ प्रभाग असे एकूण २३ प्रभाग तयार केले आहेत. या निवडणुकीत अनुसूचित जातींकरिता तीन जागा राखीव झाल्या असून त्यापैकी दोन महिलांसाठी आहेत. तर, अनुसूचित जमातीकरिता एक जागा महिलांकरिता राखीव असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
प्रभाग क्र मांक १७, २०, २१ हे अनुसूचित जातींकरिता, तर प्रभाग क्र मांक १३ हा अनुसूचित जमातींकरिता राखीव ठेवला असून प्रभाग क्र मांक १५ व २२ हे त्रिसदस्यीय प्रभाग असेल.
२६ डिसेंबरला प्रभागाच्या प्रारूप सीमा जाहीर केल्या जाणार असून त्यास हरकती घेण्याकरिता दिनांक ९ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.
या आरक्षण सोडतीस महानगरपालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यासोबतच उपायुक्त मुख्यालय विनोद शिंगटे, उपायुक्त दीपक कुरळेकर, अनिल डोंगरे, नगररचनाकार आर.एस. राठोड, करमूल्यांकन अधिकारी वंदना गुळवे, आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena-BJP in the reservation queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.