शहरं
Join us  
Trending Stories
1
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
3
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
4
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
5
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
6
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
7
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
8
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
9
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
10
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
11
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
12
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
13
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
14
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
15
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
16
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
17
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
18
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
19
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
20
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपा पुन्हा समोरासमोर, रस्ते कामाला आधीच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 04:07 IST

रस्त्याच्या श्रेयासाठी शिवसेना व सत्ताधारी भाजपा आघाडी आमने-सामने आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.

उल्हासनगर : रस्त्याच्या श्रेयासाठी शिवसेना व सत्ताधारी भाजपा आघाडी आमने-सामने आली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र भूमिपूजनाची कुणकूण लागताच शिवसेनेने दोन दिवसापूर्वी भूमिपूजन करून भाजपावर कुरघोडी केली. सरकारचा २० कोटीचा निधी व कामाला मंजुरी असताना महापालिकेने सहा महिने उशिराने रस्त्याचे काम का सुरू केले? अशी टीका शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकी दरम्यान तत्कालिन स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे यांनी चार रस्त्यासह इतर प्रस्तावांना मंजुरी दिली होती. महापालिका निवडणुकीनंतर मंजुरी दिलेल्या, व्हीटीसी ग्राऊंड ते मानेरे रस्ता, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन चौक, काजल पेट्रोलपंप ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक, जिजामाता ते उल्हासनगर स्थानक आदी चार रस्त्यांचे काम पावसाळयापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र विकासकामात सत्ताधारी भाजपाने राजकारण आणून श्रेयासाठी जाणीवपूर्वक रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप चौधरी यांनी केला. भूमिपूजनाची कुणकूण शिवसेनेला लागताच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भूमिपूजन उरकून घेतले.महापालिकेने जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे याच रस्त्यांचे भूमिपूजन मंगळवारी राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, उपायुक्त संतोष देहरकर, शहर अभियंता राम जैस्वाल यांच्या हस्ते झाले.निधी बँकेमध्ये पडूनशिवसेनेच्या प्रयत्नातून राज्य सरकारने ६ महिन्यांपूर्वी ४ मुख्य रस्त्यांसाठी २० कोटीचा निधी दिला. व्हीटीसी ते मानेरे रस्त्यासाठी साडेचार कोटी, काजल पट्रोलपंप ते विठ्ठलवाडी स्थानक रस्ता ५ कोटी, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन रस्त्यासाठी ६ कोटी तर जिजामाता ते स्थानक रस्त्यासाठी ५ कोटी असा एकूण २० कोटीचा निधी दिला आहे. मात्र निधीचा उपयोग वेळीच न केल्याने तो बँकेत पडून राहिला, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना