‘शिवसेना व्यापाऱ्यांच्या पाठीशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:32+5:302021-04-01T04:41:32+5:30

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मनपा हद्दीतील दुकाने शनिवार व रविवारी बंद ...

'Shiv Sena backs traders' | ‘शिवसेना व्यापाऱ्यांच्या पाठीशी’

‘शिवसेना व्यापाऱ्यांच्या पाठीशी’

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मनपा हद्दीतील दुकाने शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. त्याविरोधात आंदोलन, रस्ता रोको करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात रामनगर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्ष व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी भूमिका मोरे यांनी स्पष्ट केली.

शिवसेनेच्या मध्यवर्ती शहर शाखेजवळ मंगळवारी रात्री काही आंदोलक व्यापारी एकत्र जमले होते. यावेळी व्यापाऱ्यांनी मोरे यांची भेट घेतली. गुन्हे कशासाठी दाखल केले, यावर चर्चा करण्यात आली. त्यावर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी मोरे यांनी पक्ष तुमच्या समवेत आहे, चिंता करू नका, असे आश्वासन त्यांना दिले.

---------------

Web Title: 'Shiv Sena backs traders'