शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

ठाणे आंदोलनातील हिंसाचारात शिवसैनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:19 IST

हिंसेमागे राजकारणाची चर्चा; ३८ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल, अमराठी तरुणांचाही सहभाग

ठाणे : मराठा क्रांती मोर्चाच्या रास्ता रोकोनिमित्ताने बुधवारी नितीन कंपनीजवळ झालेली दगडफेक, सरकारी मालमत्तेचे नुकसान, पोलिसांवरील हल्ले, दंगल याकरिता शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम यांच्यासह ३८ जणांविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या मंडळींनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाला अडचणीत आणण्याकरिता राडा केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले असून संपूर्ण ठाणे शहरात एकूण ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागताच आयोजकांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. त्यानंतर, ठाण्यात हिंसाचार तीव्र झाला. या आंदोलनाचा समाजकंटकांनी गैरफायदा घेतल्याचा दावा आयोजकांनी केला. त्याचवेळी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीबदलाची मागणी केली. मात्र, आता शिवसेनेच्या काही मंडळींना अटक झाल्याने या सर्व घटनांची सांगड घालता हे हेतुपुरस्सर कारस्थान असल्याची कुजबूज स्थानिक भाजपा नेते करू लागले आहेत.बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर ठाण्यात नितीन कंपनी येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दंगलीचा भडका उडाला.जमावाच्या दगडफेकीत नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार लामतुरे, उपायुक्तांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे आणि निलेश मोरे हे तीन अधिकारी जखमी झाले. या तिघांनाही उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.नौपाडा पोलीस ठाण्यातील आरोपींची नावे-माजी शिवसेना नगरसेवक शरद कणसे, शिवसेना शाखाप्रमुख अशोक कदम (रामचंद्रनगर), रोहित वीर, मंगेश बांदल, महेश अतकरे, दिनेश साठे, शुभम दरेकर, अजय पाटील, वैभव पाटील, युवराज अवघडे, संदीप गावडे, हेमंत कुमावत, आकाश पवार, शिवाजी पाटील, शैलेंद्र उतेकर, संदेश पवार, संदीप कुटे, योगेश पवार, अनिकेत जाधव, निखिल वाईकर, विघ्नेश भिलारे आणि प्रणाली गोविंद आदी २५ जणांचा यात समाावेश आहे. भिलारे हा एकमेव नौपाड्यातील चंदनवाडी येथील रहिवासी असून उर्वरित सर्वजण वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, पडवळनगर, धर्मवीरनगर आणि आनंदनगर चेकनाका येथील रहिवासी आहेत. कणसे आणि कदम हे दोघे ४८ वर्षीय, तर इतर सर्वजण १८ ते २८ वयोगटांतील आहेत. त्यांच्यावर सरकारी अधिकाºयांवर हल्ला करणे, एसटी, टीएमटी या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत.आंदोलन समान नागरी कायद्यासाठीअटकेतील आंदोलकांपैकी अनेकांना कशासाठी आरक्षण हवे आहे, याचीही माहिती देता आली नाही. एकाने तर मराठा आरक्षण मिळण्याकरिता समान नागरी कायदा झाला पाहिजे, असे पोलिसांना सांगितले. तर, बहुतेकांनी आम्ही आंदोलनात नव्हतोच, अशी भूमिका घेतली.आधीच्या शिस्तीमुळे पोलीस गाफीलयापूर्वी ठाणे शहरासह महाराष्टÑभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी शिस्तीचे दर्शन घडवत शांततेने ५७ मोर्चे काढले होते. हाच इतिहास पाहून ठाण्यातील पोलीस गाफील राहिले. त्यामुळेच पोलीस वाहनांचे नुकसान झाले आणि पोलीस अधिकारीही जखमी झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.नितीन कंपनीजवळ एका तरुणीला काही आंदोलकांनी घेराव घातला होता. काही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून नौपाड्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी तिची सुटका केल्याचे उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी सांगितले.नेटकऱ्यांना त्रासमराठा क्रांती मोर्चाने बुधवारी हिंसक वळण घेतल्यानंतर गुरुवारी शेकडो जणांचे इंटरनेट बंद पडले होते. कालच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरली जाऊ नये, म्हणून पोलिसांनीच इंटरनेटवर प्रतिबंध आणल्याची चर्चा होती. परंतु, पोलिसांनी अधिकृतपणे नेटवर कोणतेही निर्बंध आणले नसल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वागळे इस्टेटमध्ये १३ जणांना अटकवागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम वाघ, उपनिरीक्षक तायडे, हवालदार सुनील शेलार आणि मिलिंद जोशी हे चौघे पोलीस आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाले, तर काहींनी सहायक आयुक्त निलेवाड आणि वरिष्ठ निरीक्षक अफजल पठाण यांच्याही सरकारी वाहनांवर दगडफेक केली. याप्रकरणी सुमारे ३०० ते ३५० जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यापैकी दारा विक्रमादित्य चौहान, अंगद लालचंद चौहान, तेजस रेणुसे, सुनील पाटील, शिवाजी कदम, निखिल जाधव, अक्षय आंबेरकर, दीपेश बनवे, राहुल चौहान, रमण लाड, राजेश बागवे, विश्वास चव्हाण आणि किरण मोरे आदी १३ जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याव्यतिरिक्त मासुंदा तलाव भागात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी गौरव देशमुख (३०, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला अटक केली असून त्यातील अन्य एकाचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पो.नि. चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाthaneठाणे