कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:54 IST2021-02-20T05:54:50+5:302021-02-20T05:54:50+5:30

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी महापालिकेत साजरी करण्यात आली. शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्य़ास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ...

Shiv Jayanti celebration at Kalyan-Dombivali Municipal Corporation | कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवजयंती साजरी

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवजयंती साजरी

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी महापालिकेत साजरी करण्यात आली. शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्य़ास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महापालिका मुख्यालयातील, त्याचबरोबर आयुक्तांच्या दालनातील महाराजांच्या पुतळ्य़ासही अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह करनिर्धारक संकलन विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी, सचिव संजय जाधव, प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आदी उपस्थित होते. महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी डोंबिवली-शिवसेना शहर शाखेनजीक असलेल्या महाराजांच्या पुतळ्य़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यंदा कोरोनाचे सावट असल्याने शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोळसेवाडी परिसरात जयंती साजरी केली. कोरोनाकाळात काम करणारे डॉक्टर, सफाई कामगार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले.

....................

फोटो-कल्याण-शिवजयंती अभिवादन

-----------------------------

Web Title: Shiv Jayanti celebration at Kalyan-Dombivali Municipal Corporation