शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

शिंदेंची कामगिरीही सुमारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:48 IST

संख्याबळ एकने घटले; पालकमंत्रीपदावर येऊ शकते गंडांतर

ठाणे : विधानसभा निवडणुकीस शिवसेना, भाजप एकत्र सामोरे गेले असले, तरी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक फायदा भाजपला झाला आहे. शिवसेनेला नऊपैकी केवळ पाच जागा मिळवता आल्याने पक्षाची जिल्ह्यावरील पकड सैल झाली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही शिवसेनेला आता भाजपचा छोटा भाऊ म्हणूनच राहावे लागणार आहे. या धक्कादायक निकालांमुळे एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश नाईक हे जिल्ह्याचे नेतृत्व करतील, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले असून, एकूणच वाटचाल त्याच दिशेने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी प्रत्येकी नऊ-नऊ जागांवर भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपच्या गीता जैन यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोराने भाजपला, तर कल्याण पश्चिमेत भाजपच्या बंडखोराने शिवसेनेला आव्हान दिले होते. यात मीरा-भार्इंदरमध्ये गीता जैन यांनी बाजी मारली असून, त्या आता भाजपबरोबरच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेची जागा भाजपने, तर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेने राखली आहे. एकूणच एका ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी शिवसेनेला सरशी मिळाली आहे. परंतु, जिल्ह्यात भाजपला आठ जागा मिळाल्या असून, गीता जैन जोडल्यास भाजपच्या खात्यात नऊ जागा आहेत.

शिवसेनेचे मात्र या निवडणुकीत मोठे नुकसान झाले. यापूर्वी शिवसेनेचे जिल्ह्यात सहा, तर भाजपचे सात आमदार होते. याशिवाय, एका अपक्ष आमदाराने भाजपची कास धरली होती. आताच्या निवडणुकीनंतर मात्र चित्र बदलले आहे. त्यानुसार, भाजपने आठ जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भार्इंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांची साथ गृहीत धरल्यास भाजपकडे जिल्ह्यात नऊ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात आणखी वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे आधी सहा आमदार होते. आता या पक्षाकडे पाच आमदार आहेत.

एकूणच भाजपच्या पारड्यात आता नऊ आणि शिवसेनेच्या पारड्यात पाच जागा राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पारडे मजबूत झाले असून भाजपकडे आता गणेश नाईक, रवींद्र चव्हाण आणि किसन कथोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. शिवसेनेकडे केवळ एकनाथ शिंदे यांचीच ताकद मोठी आहे. परंतु, आता त्यांचा सामना या तिघांशी असणार आहे.

शिंदे यांनी आपला गड राखला असला तरी, जिल्ह्यात त्यांनी जी समीकरणे निश्चित केली होती, ती पहिल्यांदा चुकीची ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच आता जिल्ह्यातील शिंदेशाहीला धक्का देण्याचे तंत्र येत्या काळात अवलंबिले जाणार असून नाईक यांना भाजपमध्ये घेण्यामागचे मूळ कारणच ते होते, हे आता या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. यापूर्वी किंगमेकर म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांना पक्षानेदेखील एकाच वेळी पालकमंत्र्यासह सार्वजनिक बांधकाम खाते आणि आरोग्य खात्यासारखी महत्त्वाची खातीही दिली होती. आता नव्या मंत्रिमंडळात त्यांच्या पदरात काय पडणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

भिवंडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रूपेश म्हात्रे यांचा पराभव झाला. शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा यांना आपल्या पक्षात खेचून ती जागा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. कल्याण ग्रामीणमध्ये ऐनवेळी सुभाष भोईर यांची उमेदवारी कापून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि हे गणितही सपशेल चुकल्याचे स्पष्ट झाले.

ठाणे शहर विधानसभेत शिवसेनेची ताकद असतानाही ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे लावता आली नाही. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच भाव खाऊन गेली. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणून शिंदेशाहीलाही येत्या काळात जिल्ह्यात घरघर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची सुरुवातच त्यांचे पालकमंत्रीपद काढून गणेश नाईक यांना देण्याने होऊ शकते. याचा फटका शिंदेंना स्वत:ला तर बसणार आहेच, शिवाय जिल्ह्यात शिवसेनेला उतरती कळा लागणार असल्याचेही या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना