शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

‘शिंदे आणखी दोन उमेदवार बदलणार’ Vs ‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 11:26 IST

आता उमेदवारी जाहीर करूनही तीन खासदारांच्या जागा बदलल्या, आणखी दोन उमेदवार बदलतील, असेही ते म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप ईशान्य मुंबईचा लोकसभा निडवणुकीचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत तीन उमेदवार बदलले आहेत. आणखी दोन उमेदवार बदलले जातील, असे भाकीत उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ईशान्य मुंबईत एका प्रचारफेरीदरम्यान आदित्य म्हणाले, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. दक्षिण मुंबईची जागा मनसेला, भाजपला की शिंदे गटाला मिळणार  हा तिढा सुटलेला नाही. शिंदे गटाने आधी सांगितले होते की, एकही खासदार निवडून नाही आला तर राजीनामा देईन. आता उमेदवारी जाहीर करूनही तीन खासदारांच्या जागा बदलल्या, आणखी दोन उमेदवार बदलतील, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची कल्याण लोकसभा मतादरसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर कल्याणची जागा मिळवण्यासाठी सोबत असलेल्या पाच जणांचा बळी मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.

‘तुम्ही न झेपणारी वक्तव्ये करू नका’

डोंबिवली : कुवतीप्रमाणे वक्तव्ये करा, आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्ये झेपत नसतील तर करू नका, असा हल्लाबोल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केला. लोकसभेच्या कल्याणच्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांनी पाच जणांचा बळी दिला, ज्यांनी शिंदेंना दिली साथ त्यांचाच केला घात, असा आरोप ठाकरेंनी केला होता. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून महायुतीचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा नागपुरात करताच रविवारी डोंबिवलीत महायुतीमधील घटक पक्षांचा मेळावा पार पडला. मेळाव्याला तिन्ही पक्षांचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मतदारसंघाच्या बूथवर तिन्ही पक्षांचे ८० हजार कार्यकर्ते काम करतील. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येईल, अशा शब्दात शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला उपस्थित आ. किसन कथोरे यांनी आम्ही भाजपसोबत आहोत असे सांगत कपिल पाटील यांच्याशी असलेल्या मतभेदांवर उत्तर देणे टाळले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा