शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

शिंदेसेनेला हवी महायुती; पण भाजपची मिठाची गुळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 08:15 IST

उद्धवसेनेच्या स्वबळाच्या दाव्यावर सरनाईकांचे तोंडसुख 

ठाणे : महापालिका निवडणुका महायुतीत लढण्याचे संकेत शिंदेसेनेकडून देण्यात आले. मात्र, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्याखेरीज भाजप महापालिका निवडणुका युतीत लढणार की स्वबळावर हे स्पष्ट करणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने शिंदेसेनेने उद्धवसेनेचे संख्याबळ एक अंकी होईल, असे भाकीत केले. परंतु, मविआतील घटकपक्ष असलेल्या शरद पवार गटाने याबाबत मौन बाळगणे पसंत केले.

ठाण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुका स्वबळावरच लढविल्या जातील, असे संकेत दिले. त्यानंतर आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी त्याला दुजोरा दिला. उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे. मात्र, भाजप आपले पत्ते लागलीच जाहीर करायला तयार नाही. स्थानिक कार्यकर्तेच युती की स्वबळावर निवडणूक लढवायची हे ठरवतील, असे भाजपने स्पष्ट केले.

आगामी महापालिका निवडणुका महायुतीत लढवणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. उद्धवसेनेने जर स्वबळावर निवडणुका लढल्या तर त्यांची दोन आकड्यांची सदस्यसंख्या एक अंकी झाल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. त्यातूनच कधी महाविकास आघाडीचे तर कधी महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे.     - प्रताप सरनाईक,    परिवहनमंत्री, महाराष्ट्र

संजय राऊत यांनी स्वबळाची भाषा का केली ते कळत नाही. मात्र, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल. त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट

महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते घेतील. त्यानंतरच याबाबत भूमिका जाहीर करता येईल.     - संजय केळकर, आमदार, भाजप

बहुमत असतानाही केवळ काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद मिळणार म्हणून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेच आता स्वबळाचा नारा देत काँग्रेसवर टीका करीत आहेत. ही रंग बदलणारी नवीन जात त्यांची आहे. आता मुंबई महापालिकेसाठी ते अशी भूमिका घेत आहेत.     - नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना, ठाणे 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेBJPभाजपा