शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील प्रधानमंत्री आवास योजनेवरून शिंदेसेना-भाजपा आमने सामने, आरोप प्रत्यारोपाला उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 22:56 IST

...या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये आहे.

उल्हासनगर : केंद्र सरकारच्या ७२३ कोटीच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ३ हजार ५७८ घरांच्या बांधण्यात येणार आहे. मात्र शिंदेसेनेच्या एका नेत्याने न्यायालयात धाव घेतल्याने, योजनेला खोडा बसणार असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला. तर भाजपा नेते योजनेच्या रिजेन्सी अंटेलिया येथील तिसऱ्या टप्प्याबाबत बोलत नसल्याचा आरोप शिंदेसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी केला.

 उल्हासनगरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शहर पूर्वेतील संतोषनगर व प्रेमनगर टेकडी येथे गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी मिळाली. योजने अंतर्गत ३ हजार ५७८ घरांच्या बांधकामासाठी महापालिकेने गेल्या आठवड्यात निविदा मागविली. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये आहे. शहरातील गृहनिर्माणाची वाढती गरज लक्षात घेता, कमी उत्पन्न गटातील नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहेत. अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली होती.

 दरम्यान भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया व प्रदीप रामचंदानी यांनी योजनेत शिंदेसेनेचा एका नेत्याने खोडा घालून न्यायालयात याचिका दाखल केल्याचा आरोप करून खळबळ उडून दिली. दरम्यान शिंदेसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, योजना नियमित व कायदेशीर होण्यासाठी न्यायालयात गेल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याबाबत भाजप व महापालिकेने कोणताही उल्लेख केला नाही. तिसरा टप्पा रिजेन्सी अंटेलिया येथील उच्चभू परिसरात २६६ कोटीतुन १३६१ घरे बांधण्याचे निश्चित केले. तेथे ही योजना होऊ नये असे काहीजनाचे प्रयत्न असल्याचे भुल्लर यांचे म्हणणे आहेत. भाजपा नेत्यांनी केलेल्या आरोपाची भुल्लर यांनी हवा काढून घेऊन रिजेन्सी अंटेलिया येथे पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

 रिजेन्सी अंटेलिया येथील जागेला पाटबंधारे विभागाचा आक्षेप पंतप्रधान आवास योजना तीन टप्प्याला मंजूर मिळाली असून तिसऱ्या टप्प्यातील रिजेन्सी अंटेलिया येथील जागा उल्हास नदी पूर नियंत्रण क्षेत्रात येत असल्याने, पाटबंधारे विभागाने आक्षेप घेतला. त्यामुळे तिसऱ्या टप्प्याबाबत शासनाला अहवाल पाठविला आहेत. त्यांची मंजुरी मिळाल्यावर योजनेचा तिसरा टप्पाचा निविदा मागविणार आहेत. (मनिषा आव्हाळे, आयुक्त उल्हासनगर महापालिका)

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2024ulhasnagarउल्हासनगर