शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

शीळफाटा-बदलापूर नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:41 IST

जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल.

भिवंडी : जिल्ह्यातील वाढती लोकवस्ती व वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांच्या सोयीसाठी नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल. तसेच शीळफाटा ते बदलापूर मेट्रो मार्गासाठी आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भिवंडीत केली.मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग तसेच डोंबिवली ते वसई जलवाहतुकीचे पंधरा दिवसांत भूमिपूजन करून येत्या महिन्यात काम सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी जाहीर केले. त्याचप्रमाणे इटलीतील व्हेनिस विमानतळाच्या धर्तीवर विमानतळावर पोहोचण्यास जलमार्ग विकसीत करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.भिवंडी तालुक्यातील वडपे ते ठाणे हा १ हजार १८३ कोटी रुपयांचा महामार्ग तसेच ४४५ कोटींच्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या नवीन महामार्गाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. खा. कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के निधी व शीळफाटा ते बदलापूर मेट्रोमार्गाची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.मेट्रो व रस्ते मार्गाने भिवंडीचा विकास होईल. लॉजिस्टीक पार्कमुळे हजारो नोकऱ्या मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. माणकोली व रांजनोली पुलाचे लांबलेले काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुर्गाडी पुलाच्या कामासाठी नव्याने निविदा काढल्या असून, ते कामही लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी जाहीर केले.मुंबई, ठाण्यासह कोकणात जलवाहतूक वेगाने होऊ शकेल. त्यादृष्टीने एमएमआर क्षेत्रात जलवाहतुकीच्या आराखड्याला पुढील आठवड्यात मंजुरी मिळेल. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या संमतीने दोन महिन्यांत रो-रो प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबई-बडोदा महामार्गाच्या निविदा काढल्या असून, पंधरा दिवसांत भूमिपूजनही करता येईल. जलवाहतुकीसाठी डोंबिवली ते वसईपर्यंत आठ जेट्टींना मंजुरी दिली आहे. ठाणे-वसई जलमार्गाचेही १५ दिवसांत भूमिपूजन होऊन, महिनाभरात काम सुरू होईल.जलवाहतुकीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली. भिवंडी व कल्याण मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी मास रॅपीड ट्रान्सपोर्टचा फायदा होईल. माळशेज घाट रस्त्याचा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचे काम तातडीने सुरू होईल.मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेचे कामही सुरू असून, भूसंपादन झाले आहे. यासाठी अविकसीत भागातील जमीन संपादीत केल्याने, या भागाचा विकास होईल, असे गडकरी म्हणाले.>... तर मुंबईचा समुद्रही मॉरिशसप्रमाणे शुद्धगंगानदीचे शुद्धीकरण होऊ शकते, तर मुंबईचा अरबी समुद्रही मॉरिशसच्या समुद्राप्रमाणे शुद्ध करता येईल. मात्र, त्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज गडकरी यांनी अधोरेखित केली.