शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

फेरबदल हे आयुक्तांचे अधिकार; वैद्यकीय अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:28 AM

तत्कालीन पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी त्यांचा मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार तत्काळ काढून तो डॉ. जयवंत धुळे यांच्याकडे सोपवला

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार पालिका आयुक्तांनी काढून घेतल्यामुळे नाराज होऊन अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांनी प्रशासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. पालिका कामकाजात फेरबदल करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना असून त्या अधिकारात त्यांनी शेट्टी यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेतल्याने त्यांच्या कोणत्याही कायदेशीर हक्काला बाधा येत नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे.

पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असताना डॉ. शेट्टी यांनी कामामध्ये अनियमितता आढळल्याने शासनाच्या आदेशावरून आयुक्तांनी पालिकेचे मुख्य लेखाधिकारी कालिदास जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.चौकशीअंती डॉ. शेट्टी यांच्या कामावर ताशेरे ओढणारा अहवाल आयुक्तांना सादर केला गेला. शेट्टी या दोषी आढळून आल्यामुळे तत्कालीन पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी त्यांचा मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार तत्काळ काढून तो डॉ. जयवंत धुळे यांच्याकडे सोपवला. त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. शेट्टी यांनी न्यायालयात धाव घेऊन आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या याचिकेची सुनावणी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली.

पालिका आयुक्तांना प्रशासनाचे कामकाज चालवण्याचे कायदेशीर अधिकार प्राप्त असून जबाबदारीमध्ये फेरबदलाचे अधिकारही प्राप्त आहेत. त्यामुळे डॉ. शेट्टी यांच्याकडील कार्यभार काढून घेतल्याने त्यांच्या कोणत्याही कायदेशीर हक्काला बाधा येत नाही, असे मत नोंदवत न्यायालयाने याचिका फेटाळली.