मुंब्य्रातील ‘ती’ पाच मजली इमारत पाडण्यास सुरुवात; महापालिकेची खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 03:05 IST2020-08-28T03:05:40+5:302020-08-28T03:05:46+5:30
सम्राटनगर परिसरातील प्रियंका अपार्टमेंट ही तळ अधिक पाच मजली इमारत एका बाजूला झुकल्याचे मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर बुधवारी ती रिक्त केली होती.

मुंब्य्रातील ‘ती’ पाच मजली इमारत पाडण्यास सुरुवात; महापालिकेची खबरदारी
मुंब्रा : बांधकामानंतर अवघ्या १२ वर्षांमध्ये एका बाजूला झुकल्यामुळे अतिधोकादायक बनलेली मुंब्य्रातील ती पाच मजली इमारत तोडण्यास गुरुवारी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.
येथील सम्राटनगर परिसरातील प्रियंका अपार्टमेंट ही तळ अधिक पाच मजली इमारत एका बाजूला झुकल्याचे मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर बुधवारी ती रिक्त केली होती. ही इमारत ज्या परिसरात आहे, तेथील जागा अतिशय अरुंद असल्यामुळे तेथे आधुनिक मशिनरी जाऊ शकत नसल्याने कंपन न होणाऱ्या कटरच्या साहाय्याने ती तोडण्याचा निर्णय ठामपा प्रशासनाने घेतला. त्यानुसार, गुरुवारी पहिल्या, दुसºया, तिसºया आणि चौथ्या मजल्यावरील खोल्यांच्या विटांचे बांधकाम तसेच स्लॅब तोडून इमारतीवरील भार कमी करण्यात आला. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सदर इमारत तोडताना बाजूच्या गिरिजा टॉवर आणि गणेश अपार्टमेंट या दोन्ही इमारतीही काही काळासाठी तात्पुरत्या रिक्त केल्या होत्या, अशी माहिती उपनगर अभियंता धनंजय गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.