शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांचे घर तटकरेंनी फोडले; आव्हाडांचा आरोप, राष्ट्रवादीचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 08:26 IST

देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शरद पवारांचे घर सुनील तटकरे यांनी फोडले, असा आरोप शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही, असे आवाहनही ठाण्यात आयोजित शिमगोत्सवात त्यांनी कोकणवासीयांना केले.

देश वाचवायचा असेल तर सत्ताबदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड - कळवा येथे कोकणचा शिमगोत्सव व पालखी नृत्य स्पर्धा झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनीही त्यास हजेरी लावली. सुनील तटकरे हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचे काम करतात. तटकरे स्वतः आमदार-मंत्री, मुलगा-मुलगी-पुतण्या-भाऊ हेही आमदार अशा पाच जणांना शरद पवार यांनी पदं दिली. एवढी पदं मिळालेले महाराष्ट्रातील घराणे सांगा? असे ते म्हणाले.

ठाणे : जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून, ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सोमवारी केला. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर केली होती. 

आव्हाडांनी केलेल्या टीकेला परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. परांजपे म्हणाले, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करतो. शरद पवारांना आव्हाडांनी विचारावे की, २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला कोणी सांगितला?  शरद पवार यांना कायम खोटेनाटे सांगण्याचे काम आव्हाड यांनी केले. भिवंडीची जागा हट्टापायी घेतली असून, आता त्या जागेवर उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार