शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शालिमार एक्स्प्रेसमध्ये मद्यधूंद सफाई कामगारांची प्रवाशासोबत हुज्जत; बँग फेकण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:32 IST

मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली.

ठाणे - कुर्ला टर्मिनन्स येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली. या प्रवासा दरम्यान मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर त्याची बँग हिसकवण्याचा ही प्रयत्न केला. ठाणे स्टेशन सोडल्यानंतरही या कामगारांची दमदाटी सुरूच होती.

ठाणे येथून रात्री सुमारे 10.15 वाजे दरम्यान ही गाडी सुटलेली असतानाही कामगारांची ही दहशत सुरूच होती.कल्याणला उतरण्यासाठी काही जण आधीच दरवाज्यात आले. त्यांना ही मनमानी लक्षात आली. भीती वाटणारा त्यांचा आवतार पाहून कोणी ही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. यावेळी काही जणांनी एकत्र येवून ही मनमानी थांबवण्याचा प्रयत्न केला. या कामगाराना पाहूम गडी माणसाना भीती वाटत होती. पण रात्री - बेरात्री बाथरूमला येणाऱ्या महिला प्रवाशांना देखील या मद्यधूंद कामगारांचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन बोगीतील टिसी मास्तरला हा प्रकार निदर्शनात आणून दिला. रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्यांमधील बाथरूम सपाईसाठी खाजगी क्वाँट्रँक्टरद्वारे सपाई कामगार ठेनले जात आहेत. पण तसे फारसे उपयुक्त ही ठरत नसलेल्या या कामगारांची दहशत मात्र जीव घेणी ठरत आहे. मद्यधूंद अवस्थेतील हे कामगार बोगीत रात्री बेरात्री कारण नसतानाही हिंडत असतात. त्यांच्यातील काही कर्मचारी गुन्हेगार प्रव्रतीचे असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे वर्तनही योग्य नसल्याचे आढळून येते. या मद्यधू्ंद अवस्थेतील कामगारांपासून महिला प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा अतिप्रसंग व चीजवस्तू लांबवण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी रात्री कल्याण स्टेशन येईपर्यंत या कामगारांचा धुमाकूळ सुरूच होता. ते मोठमोठ्याने आवाजही करीत होते. ते कोणाचे ऐकूण ही घेत नव्हते. बोगी क्रमांक 4 मधील हा प्रकार टिसींच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी कामगारांच्या मँनेजरच्या लक्षात आणून दिले. पण त्यानंतर या कामगारांना उतरवून देणे अपेक्षित होते. पण या सारखी कारवाई न झाल्यावे व ते कामगार गाडीतच असल्याने संबंधीत प्रवाशास या कामगारांची भीती वाटत होती. प्रवासा दरम्यान त्यांच्याकडून त्रास होण्याची शक्यता या प्रवाशाकडून व्यक्त करण्यात येत होती.